HW News Marathi
Uncategorized

येत्या २४ तासांत मुसळधार पावसाची शक्यता

मुंबई | गेल्या चार दिवसांत मुंबईसह उपनगरात ६०० मिमी पेक्षा जास्त पाऊस पडला आहे. आठवड्याच्या सुरुवातीलाच आज (१ जुलै) पावसाने मुंबईकरांचे हाल झाले. तिन्ही मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. मुंबईसह ठाणे-रायगड-पालघरमध्ये जास्त पावसाची शक्यता आहे.

मुंबईसह उपनगर, ठाणे आणि पालघरला मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. येत्या २४ तासांत मुसळधार पावसाची शक्यता असून सतर्कतेचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. तसेच स्कायमेटने देखील आणखी दोन दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शेकापचे जयंत पाटील यांनी पत्रकारला कानशीलात लगावली

News Desk

Pradhan Mantri Kaushal Vikas Yojana | दावा केलेले लाभार्थी एच डब्ल्यूवर

Atul Chavan

कोरेगाव-भीमा तपास एनआयएकडे सोपविण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या निर्णयावर शरद पवार नाराज

News Desk