HW News Marathi
Uncategorized

रोहित पवारांची लागणार मंत्रिमंडळात वर्णी?

बारामती । राज्याच्या मंत्रिमंडळाचा छोटा विस्तार लवकरच होणार असल्याचे वृत्त आहे. याच पार्श्वभूमीवर, आता राज्यातील युवा नेते, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवारांना थेट कॅबिनेट मंत्री पदाची संधी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यामुळे रिकाम्या झालेल्या जागेवर राज्याचे कामगार आणि उत्पादन शुल्क दिलीप वळसे पाटील यांनी गृहमंत्री पदाची धुरा सांभाळली आहे. त्यामुळे, सध्या कामगार आणि उत्पादन शुल्क हे कॅबिनेट मंत्रिपद सध्या रिकामं आहे. सुरू असलेल्या चर्चांनुसार, या जागेवर आमदार रोहित पवारांची वर्णी लागू शकते.

आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्रीपद भूषवत असलेले मंत्री हसन मुश्रीफ यांनीही कोल्हापूरकडे दुर्लक्ष होत असल्याचं सांगत यापुढे पालकमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारणार नसल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्रीपदही आमदार रोहित पवारांच्या गळ्यात पडू शकतं, अशी देखील माहिती विश्वसनिय सूत्रांनी दिली आहे. मात्र, या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आता यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार काय निर्णय घेणार? राष्ट्रवादीच्या तिसऱ्या पिढीचे वारसदार म्हणून रोहित पवारांकडे पाहिलं जातं. रोहित पवार यांना मंत्रीपद अन् पालकमंत्र्यांची धुरा सांभाळायला दिली तर अहमदनगर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजून मजबूत होणार असल्याचं म्हटलं जातं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बारावा वाढदिवस साजरा केला, तोच ठरला चौघांचा अखेरचा दिवस

News Desk

पालघरमधील निवडणुकीतील गोंधळा विरोधात जनहित याचिका दाखल

News Desk

विद्युत नियामक आयोगाला राज ठाकरेंनी लिहिले पत्र

swarit