HW News Marathi
Uncategorized

महिलेने दिला चार मुलांना जन्म

मुंबई सर जेजे रूग्णालयात जहानरा शेख या महिलेने एकाच वेळी चार मुलांना जन्म दिला. एक मुलगा तर तीम मुली आहेत.ऑगस्ट महिण्यात बळांना जन्म दिल्यानंतर तब्बल एक महिना रुग्णालयात राहिल्यानंतर रविवारी जहानराला घरी पाठवण्यात आलं.

मुळची नाशिकची २९ वर्षांची जहानरा शेखला, सहाव्या महिन्यात करण्यात आलेल्या सोनोग्राफीमध्ये पोटात चार गर्भ असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. त्यानंतर जून महिन्यात मुंबईच्या जे.जे रुग्णालयात ती दाखल झाली.

माय मेडिकल मंत्राशी बोलताना जहानरा शेखचे पती नाझीम शेख म्हणाले की, “सहाव्या महिन्यात सोनोग्राफी तपासणीत पोटात चार मुलं असल्याचं कळलं. नाशिकमधील डॉक्टरांनी, पत्नीच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो त्यामुळे जे.जे.रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला. प्रिती लुईस यांनी पत्नीवर उपचार सुरू केले. गेल्या तीन महिन्यांपासून रुग्णालयातच उपचार सुरू होते. घरीही जाता आले नाही. लग्नानंतर सहा वर्षांनी पत्नी गरोदर राहिली होती. त्यातही तिच्या जीवाला धोका असल्याने मनात भिती होती. पण देवाच्या कृपाने पत्नी व मुलं सर्व सुखरूप आहेत.”

तर, जे.जे. रुग्णालयातील स्त्रीरोग विभागाचे प्रमुख डॉ. अशोक आनंद म्हणाले की, “ही महिला जूनमध्ये रुग्णालयात उपचारासाठी आली होती. सिझेरियनद्वारे सुखरूप प्रसूती करण्यात आली असून महिनाभर तिच्यावर उपचार सुरू होती. रविवारी तिला डिस्चार्ज देण्यात आला.” डॉ.लुईस सांगतात की, “देशात सात लाख गरोदर महिनांमध्ये एका महिलेच्या गर्भात एकामध्ये अधिक बाळं असतात. पण यामुळे घाबरून न जाता योग्य पद्धतीने उपचार केल्यास कोणाच्याही जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता फार कमी असते.”

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राहुल गांधी देशाचे नेतृत्व करण्यासाठी सक्षम: शिवसेना

News Desk

भोकर व बिलोली ग्रामीण रुग्णालयाला शासनाचा “कायाकल्प” पुरस्कार

News Desk

Umesh Kolhe हत्याप्रकरणी BJP खासदार Anil Bonde यांची प्रतिक्रिया!

News Desk