HW News Marathi
Uncategorized

कल्याणमध्ये महिला पोलीस अधिकाऱ्याची महिलेला मारहाण, CCTV

गाऊन घालून मंदिरात गेल्याचा जाब विचारल्यानं संताप

कल्याण (गौतम वाघ)- गाऊन घालून मंदिरात गेल्याचा जाब विचारल्यानं संतापलेल्या महिला पोलीस अधिकाऱ्यानं महिलेला मारहाण केल्याची घटना कल्याण पूर्वेत घडलीये. सोमवारी सायंकाळी तिसगाव भागातल्या तिसाई मंदिराच्या आवारात हा प्रकार घडलाय. हा सगळा प्रकार सीसीटीव्हीत कैद झालाय. कल्याण पूर्वेतल्या या मंदिरात महिलांनी गाऊन घालून जाऊ नये असा नियम असून तरीही प्रतीक्षा लाकडे या महिला पोलीस अधिकारी मंदिरात गाऊन घालून गेल्या. त्याचा आशा गायकवाड या स्थानिक महिलेनं जाब विचारल्यामुळे संतापलेल्या लाकडे यांनी गायकवाड यांना खाली पाडून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. वास्तविक हा मंदिरात गाऊन घातलेल्या महिलांना प्रवेश न देणं हा प्रकार चुकीचाच असला, तरी महिला पोलीस अधिकारी लाकडे यांना त्याबाबत तक्रार करता आली असती, मात्र त्यांनी केलेल्या मारहाणीमुळे कल्याण पूर्व भागात पोलिसांबद्दल संताप व्यक्त होतोय. या सगळ्या प्रकाराबाबत पोलिसांनी परस्परविरोधी एनसी दाखल करून घेतल्यानं पोलीस लाकडे यांना पाठीशी घालत असल्याचाही आरोप स्थानिकांचा आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जगानेही मान्य केले भारतातील मोदींचे नेतृत्व, अनेक देशांच्या राष्ट्राध्यक्षांनी दिल्या शुभेच्छा

swarit

‘कुणी असो वा नसो…दादांचं मंत्रालयात काम सुरू’ मुंडेंच्या दादांना शुभेच्छा अन् मुख्यमंत्र्यांना टोला

News Desk

जीएसटीच्या विरोधात सुमारे १२ लाख यंत्रमाग कारखान्याची धड-धड बंद, लाखों कामगारांवर येणार उपासमार

News Desk