HW News Marathi
Uncategorized

आता येणार दोनशे रूपयांच्या नोटा

मुंबई – काळा पैसा आणि बनावट नोटांपासून सामान्यांची फसवणूक होऊ नये यासाठी केंद्र सरकारनं नोटाबंदीचा निर्णय घेतला होता. त्यानंतर पाचशे आणि दोन हजारांच्या नव्या नोटा रिझर्व्ह बँकेनं (आरबीआय) चलनात आणल्या होत्या. त्यानंतर आता दोनशे रूपयांची नवी नोट बाजारात येणार आहे. केंद्र सरकारच्या आदेशानंतर दोनशे रूपयांच्या नोटा छापायला सुरूवात केलीय.

बाजारातील दैनंदिन व्यवहार सुरळीत होण्याच्या उद्देशानं दोनशे रूपयांची नवी नोट चलनात आणत असल्याचं आरबीआयनं स्पष्ट केलंय. मात्र, असं असलं तरी दोनशे रूपयांची नोट बाजारात आणण्याचा निर्णय हा नोटाबंदीच्या आधीच घेण्यात आला होता, त्याची अंमलबजावणी आता सुरू केल्याचं रिझर्व्ह बँकेचं म्हणणं असल्याचं ‘इकॉनॉमिक्स टाइम्स’च्या वृत्तात म्हटलंय. नोटाबंदीनंतर नोटांचा तुटवडा निर्माण झाला होता, मात्र आता नव्यानं येणाऱ्या दोनशे रूपयांच्या नोटांमुळं ही तफावत काहीशी कमी होईल, अशी अपेक्षा वर्तवली जात आहे. दोनशे रुपयांच्या नोटा चलनात आणण्याच्या प्रस्तावाला आरबीआयच्या मंडळाने यापूर्वीच संमती दिली होती. दैनंदिन व्यवहार सुलभ करण्याच्या दृष्टीने सरकारने याबाबत चाचपणी केली होती. या सर्व चाचपण्या झाल्यानंतर दोनशे रूपयांची नवी नोट बाजारात आणण्याच्या हालचालींना वेग आल्याचं सूत्रांनी सांगितलं.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ग्रामीण विकासात पदविका अभ्यासक्रम

News Desk

भारतामध्ये वटवाघळांमुळे कोरोना आला नाही किंवा पसरला नाही…

News Desk

नवाब मलिक हे एका चिडीतून सगळं करताय शिवसेना खासदार संजय राऊतांच वक्तव्य

News Desk