HW News Marathi
Uncategorized

जीएसटीच्या विरोधात सुमारे १२ लाख यंत्रमाग कारखान्याची धड-धड बंद, लाखों कामगारांवर येणार उपासमार

भिवंडी देशभरात एक जुलै पासून लागू झालेल्या जिएसटी या जाचक कराच्या विरोधात गुजराथच्या सुरत शहरातील यंत्रमाग कपडा व्यापाऱ्यांचे सुरु असलेल्या आंदोलनाचे पडसाद भिवंडी शहरात पाहवयास मिळाले. आज यंत्रमागधारकांनी केंद्र सरकार विरोधात एल्गार पुकारत छोट्या यंत्रमागधारकांना जीएसटी प्रणालीचा नाहक फटका बसणार असल्याने आजपासून पाच दिवसाचा बंद पुकारण्यात आला आहे. मात्र या निर्णयाने लाखों कामगारांवर उपासमारीची वेळ येणार असून भिवंडीतील विविध यंत्रमाग व्यावसायिकांच्या संयुक्त बैठकीत केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी करीत संयुक्तपणे बंदचा निर्णय घेतला. यामुळे सरकार विरुद्ध यंत्रमागधारकांमध्ये संघर्षाची ठीनंगी पडण्याची शक्यात वर्तवली जात आहे.

भिवंडीतील अंजूरफाटा परिसरातील हालारी पॉवरलूम असोसिएशनच्या सभागृहात जिएसटी कराच्या विरोधात झालेल्या सभेत कॉग्रेसचे माजी खासदार सुरेश टावरे, भिवंडीचे शिवसेनेचे आमदार रुपेश म्हात्रे, मन्नान सिद्दीकी, हबीब बाबा, रतिलाल सुमारीया, शरदराम शेजपाल, चंदुलाल सुमारीयासह विविध यंत्रमाग व्यवसायिक संघटनेचे प्रतिनिधींसह शेकडोच्या संख्येने यंत्रमाग व्यावसायिक उपस्थित होते.

केंद्र सरकारने नव्या वस्तू व सेवा कर प्रणालीमध्ये देशात कृषी नंतर सर्वाधिक रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या यंत्रमाग व्यवसायाचे कंबरडे मोडणार असल्याचे यंत्रमाग व्यावसायिकांच्या विविध संघटनेच्या पदाधिका-यांनी सांगितले. यंत्रमाग व्यवसायात आमचा धाग्यावरील जीएसटीस विरोध नसून त्यानंतर जॉब वर्क करून कच्चा कपडा बनविणाऱ्या छोट्या कारखानदारांवर, सायझिंग व्यवसाय व विक्री होणाऱ्या तयार कपड्यावर लावला जाणारा जिएसटी कर जाचक असून हि करप्रणाली छोट्या व्यापाऱ्याला उध्वस्थ करून कार्पोरेट संक्षेत्रातील मोठ्या धनिकांसाठी लाभदायक असल्याचे सांगितले.

यंत्रमाग व्यावसायिकांनी आपल्या मनोगतात छोट्या व्यावसायिकांना जिएसटी प्रणाली प्रमाणे कर भरणे कठीण जाणार असून त्यास विरोध करण्यासाठी संपूर्ण भिवंडी शहरातील सुमारे १२ लाख यंत्रमाग कारखानदारांनी सरकार विरोधात यंत्रमाग कारखाने आजपासून १५ तारखेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यानंतरही सरकारने जीएसटीच्या जाचक अटीतून यंत्रमागधारकांना सवलत न दिल्यास आंदोलन करून बेमुदत बंद करण्यात येईल. आणि त्याच्या परिणामाची जबाबदारी सरकारची राहील. दरम्यान विविध संघटनांच्या सुकाणू समितीमध्ये निर्णय घेऊन सरकारने हा जीएसटीचा निर्णय तातडीने मागे घ्यावा याची मागणी करूही सरकारने याची दखल न घेतल्याने हा बंद पुकारण्यात आल्याचे सांगण्यात आले. गुजरात राज्यातील सुरत येथे आंदोलन करणाऱ्या यंत्रमाग व्यावसायिकांवर स्थानिक पोलिसांनी केलेल्या लाठीमार वेळी एक आंदोलकाऱ्याचा मूत्यू झाल्याने त्यांना श्रद्धांजली देवून मोदी सरकारचा एकमुखीने निषेध नोंदविण्यात आला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

फेरीवाल्यांना हटवल्या प्रकऱणी मनसेच्या कार्यकर्त्यांना अटक

News Desk

NIA ने वाझेंवर वरदहस्त ठेवणाऱ्या नेत्यापर्यंत पोहचले पाहिजे ! राऊतांकडे रोख ठेवत काँग्रेस नेत्याची प्रतिक्रिया

News Desk

साता-यात २२  वर्षीय युवक कोरोना बाधित, २४ अनुमानित म्हणून विलगीकरण कक्षात दाखल

News Desk