HW News Marathi
Covid-19

कोरोना रुग्ण संख्येच्या बाबतीत भारताने इटलीला टाकले मागे

नवी दिल्ली | जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढतच आहे. अशातच काल (५जून) भारतात आत्तापर्यंत नोंद झालेल्यांपैकी सगळ्यात जास्त कोरोना रुग्ण काल आढळले आहेत. काल एका दिवसात ९८८७ रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

भारताने इटलीही कोरोनाच्या संख्येत मागे टाकले आहे. देशातील तज्ज्ञांनी काही दिवसांपूर्वी जून किंवा जुलै महिन्यात भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव शिगेला पोहोचेल, असा अंदाज वर्तवला होता. हा अंदाज आता खरा ठरताना दिसत आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांत देशात सातत्याने ९५०० पेक्षा जास्त रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे जगात सर्वप्रथम कोरोनाचा मोठा फटका बसलेल्या इटलीला रुग्ण संख्येच्या बाबतीत भारताने मागे टाकले आहे. त्यामुळे भारतातील परिस्थिती चिंताजनक झाली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोरोनाबाधितांची लूट करणाऱ्या मुंबईतील ३७ खाजगी रुग्णालयांना पालिकेचा दणका 

News Desk

पुण्यात १२ तासांत ३५ नवे रुग्ण, एकूण कोरोनाबधितांचा संख्या ३ हजार १६९ वर

News Desk

महाराष्ट्राने लसीकरणाचा वेग दुप्पट करावा, प्रकाश जावडेकरांची विनंती

News Desk