HW News Marathi
महाराष्ट्र

पुरोगामी महाराष्ट्राचा चेहरा म्हणून पाहिले जाणारे; शेकपाचे ज्येष्ठ नेते एन. डी. पाटील हरपले

कोल्हापूर | शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते प्राध्यापक एन. डी. पाटील यांचे आज वयाच्या ९३ व्या वर्षी निधन झाले. एन. डी. पाटील यांना ब्रेन स्ट्रोक आल्याने गेल्या चार दिवसांपासून कोल्हापूरमधील खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. एन. डी. पाटील यांच्या जाण्याने शोषित आणि वंचितांचा आधार हरपल्याची सर्व स्तरातून होत आहे. काही दिवसांपूर्वी एन. डी. पाटील यांनी रस्त्यावर उतरून आंदोलनात सहभाग घेतला होता. 

एन. डी. पाटील यांना पुरोगामी महाराष्ट्राचा चेहरा म्हणून पाहिले जाते होते. एन. डी. पाटील यांनी महाराष्ट्राचे सहकारमंत्री म्हणून त्यांना ठसा उमटवला. पाटील हे शाळेत असताना त्यांना सत्यशोधक विचार ऐकले होते. पाटील यांनी पुढे जाऊन कर्मवीर भाऊराव पाटील यांची भेट घेऊन रयत शिक्षण संस्थेशी संबंध आला. यावेळी पाटील यांनी नोकरी सोडून पूर्णवेळ शेतकरी कामगार पक्षाला देण्याचा निर्णय घेतला. शेकपाचे जीवनदानी कार्यकर्ते बनले होते. पक्षाचे विचार तळगाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ते झटले होते. तसेच शेतपाच्या वतीने एन. डी. पाटील विधानपरिषदेवर गेले होते. 

 एन. डी पाटील यांनी त्यांच्या अभ्यासाच्या जोरावर सभागृहात जोरदार भाषण देते. विधीमंडळाच्या सभागृहात लोकांच्या प्रश्नांची चर्चा केली, आणि त्यांचे प्रश्न सोडवले. एन. डी. पाटील यांनी १८ वर्षे सभागृहात काम केले असून १९७८ साली ते पुलोद सरकारमध्ये सहकारमंत्री म्हणून काम केले. यावेळी एन. डी. पाटील यांनी केलेल्या कामाची त्यांची चर्चा आजही होत होती. एन. डी.  पाटील यांनी कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या फायद्याची ठरलेली कापूर एकाधिका योजना ही त्यांनी सुरू केली. एन डी पाटील यांच्यासमोर महात्मा फुले आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांचा आदर्श होता. 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

मतदानाची प्रक्रिया समजवण्यासाठी आमदारांना हॉटेलमध्ये ठेवले, आमदारांना कोडलं म्हणणारे मुर्ख!

Aprna

Pune Wall Collapse : सरकारकडून मृतांच्या नातेवाईकांना ५ लाख, तर जखमींना २५ हजार

News Desk

सचिन पायलट यांचं समर्थन केल्याने महाराष्ट्रातील काँग्रेसचा मोठा नेता निलंबित !

News Desk