HW News Marathi
महाराष्ट्र

प्रजासत्ताक दिनी महाराष्ट्राच्या चित्ररथाला परवानगी नाकारलेली नाही!; सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे स्पष्टीकरण

मुंबई | प्रजासत्ताक दिनी नवी दिल्ली येथे होणाऱ्या संचलनात महाराष्ट्र राज्याच्या चित्ररथाला परवानगी नाकारण्यात आल्याचे वृत्त काही प्रसार माध्यमांतून प्रसिद्ध करण्यात आले होते. मात्र, ते वृत्त चुकीचे असल्याचे समजले असून महाराष्ट्राच्या चित्ररथाला परवानगी नाकारलेली नाही, या संदर्भात सांस्कृतिक कार्य संचालनालयाने स्पष्टीकरण दिले आहे.

प्रजासत्ताक दिनी नवी दिल्ली येथे होत असलेल्या संचलनात महाराष्ट्र राज्याने सादर केलेल्या विविध विषयांमधून या वर्षी ‘महाराष्ट्राची जैवविविधता व मानके’ या विषयाची केंद्र शासनाकडून निवड करण्यात आली आहे. याबाबत वेळोवेळी संरक्षण मंत्रालयाच्या सूचनेनुसार बैठका आयोजित होऊन महाराष्ट्र राज्याच्या चित्ररथाची एकूण १२ राज्यांसमवेत निवड अंतिम करण्यात आलेली आहे. सद्यस्थितीत राष्ट्रीय रंगशाळा, नवी दिल्ली येथे संरक्षण मंत्रालयाच्या देखरेखीखाली चित्ररथाची बांधणी सुरु असून हे काम अंतिम टप्प्यात आहे. तर महाराष्ट्राच्या चित्ररथाला परवानगी नाकारल्याबाबत कोणतीही सूचना संरक्षण मंत्रालयाकडून प्राप्त झालेली नाही, असे स्पष्टीकरण सांस्कृतिक कार्य संचालनालयाने केले आहे.

२६ जानेवारी रोजी राजपथावर होणाऱ्या संचलनात देशातील विविध राज्यांच्या संस्कृतीचे प्रतिक असणारे चित्ररथ सहभागी होत असतात. यामध्ये विविध राज्यांच्या चित्ररथांना दरवर्षी ठराविक निकषांनुसार संधी दिली जाते. त्याच प्रमाणे महाराष्ट्राचा चित्ररथ देखील यंदा राजपथावर दिसणार आहे. आपला भारत देश हा जैवविविधता संपन्न असून महाराष्ट्रातील चार प्रमुख भागांमध्ये जैवविविधता दिसून येते. तसेच वातावरणातील होणाऱ्या बदलांचा विचार करता पर्यावरणाच्या संरक्षणासाठी महाराष्ट्र आघाडीवर आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात आज अखेर लम्पी आजारावरील १०६.६२ लाख लस मात्रा उपलब्ध

Aprna

पांडुरंगाच्या ” रिंगण ” सोहळ्यासाठी एस.टी.च्या जादा बसेस

News Desk

दिवशी प्रकल्पाचे काम दर्जेदार व गुणवत्तापूर्ण करण्याचे मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांचे निर्देश

Aprna