HW News Marathi
महाराष्ट्र

वाशिममधील भाजपच्या पदाधिकार्‍यांचा उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश

मुंबई | उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच वाशिम जिल्हाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांच्या पुढाकाराने भाजप पक्षातील अनेक मान्यवरांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. राष्ट्रवादी भवन, मुंबई येथे घेण्यात आलेल्या या कार्यक्रमात भाजपचे माजी नगराध्यक्ष भगवानराव क्षीरसागर, किरण क्षीरसागर, तालुकाध्यक्ष गजानन दहातोडे, कपिल नकवाल, अनिल अग्रवाल यांनी पक्षात प्रवेश केला. या पक्षप्रवेश कार्यक्रमाला वाशिम जिल्ह्यातील पक्षाचे वरिष्ठ नेते अंकुश देशमुख, बाबाराव खडसे, सोनाली ठाकूर, युसुफ पुंजाणी, दत्ता डहाके, अशोक परळीकर उपस्थित होते.

याच दरम्यान नवी मुंबईतील जिल्हाध्यक्ष अशोक गावडे यांच्या पुढाकाराने आप पक्षातील दत्तात्रय नागरे ( माजी सहा. आयुक्त, नवी मुंबई महानगरपालिका ) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे घड्याळ हाती बांधले. त्यांच्यासमवेत सचिन सावंत, चंद्रकांत पाटील यांनीही पक्षात प्रवेश केला. यावेळी प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, महिला प्रदेशाध्यक्षा विद्याताई चव्हाण, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव, युवक कार्याध्यक्ष सूरज चव्हाण आदी उपस्थित होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शिवसेनेची ‘जन आशीर्वाद’ यात्रा स्थगित

News Desk

‘सारथी’ संस्थेला स्वायत्तता देण्याची उपमुख्यमंत्री अजित पवारांची घोषणा

News Desk

राज्यात थंडीचा जोर वाढला, मुंबईत १२.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद

swarit