मुंबई | कॉर्डिलिया क्रूझवरील ड्रग्ज पार्टी प्रकरणी एनसीबीचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे यांची डायरेक्टरेट जनरल ऑफ अॅनालिटिक्स अँड रिस्क मॅनेजमेंट (डीजीआरएम) मुंबईमधून चेन्नईचे केंद्रीय महसून सेवा महासंचालनालय अतिरिक्त आयुक्त पदी त्यांची बदली झाली आहे. नुकतेच कॉर्डिलिया क्रूझवरील ड्रग्ज पार्टी प्रकरणी अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान एनसीबीच्या एसआयटी टीमने क्लिनचीट दिली आहे. या प्रकरणी वानखेडेंनी योग्य तपास न केल्याचा ठपका ठेवत, कारवाई करण्याचे आदेश केंद्रीय गृहमंत्रालायने दिल्याची माहिती एएनआय वृत्त संस्थेने दिली होते.
ड्रग्ज प्रकणात एनसीबीने एकून सहा जणांना क्लिनचीट दिली असून या सहा जणांमध्ये आर्यन खानचे नाव आहे. या सहा जणांकडे अंमली पदार्थ सापडलेला नाही. त्यामुळे एनसीबीने आर्यन खान आणि महक या दोघांना क्लीनचीट देण्यात आली आहे. परंतु, आर्यन खानचे मित्र मुनमुन धमेचा आणि अरबाज मर्चंट यांच्याकडे अमली पदार्थ सापडेल होते. एनसीबीच्या टीमने मुनमुन धमेचा आणि अरबाज मर्चंट या दोघांना मात्र क्लिनचीट दिलेली नाही.
Former Mumbai NCB Zonal director Sameer Wankhede transferred from Mumbai to Chennai
Earlier he was a part of investigation of the drugs-on-cruise case, Mumbai
(File photo) pic.twitter.com/q6hiVdUuOe
— ANI (@ANI) May 30, 2022
वानखेडेंनी आर्यन खानवर केलेली कारवाई ही बोगस असल्याचा आरोप कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांनी केली होती. केंद्रीय गृहमंत्रालायने दिलेल्या आदेशानंतर मलिकांनी केलेल्या आरोपावर शिक्कामोर्ताब झालेला आहे. क्रूझ प्रकरणी वानखेडेंनी आर्यन खान, अरबाज मर्चेंट, मुनमुन धमेचा, विक्रांत छोकर, मोहक जैसवाल,इशमित सिंह, गोमती चोप्रा, नूपुर सतीजा, अब्दुल कादर शेख, श्रेयश नायर, मनीष राजगरिया, अविन साहू, समीर सिंघल, मानव सिंघल, भास्कर अरोरा, गोपाल जी आनंद, अचीत कुमार, चीनेडु इग्वे, शिवराज हरिजन, ओकोरो उजेओमा या सर्वांना या प्रकरणात अटक करण्यात आली होती. यातील ६ जणांना एनसीबीच्या एसआयटी टीमने क्लिनचीट दिली आहे. आर्यन खान, अविन शुक्ला, गोपाल आनंद, समीर साईघन, भास्कर अरोरा, आणि मानव सिंघल या सहा जणांना क्लिनचीट दिली आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.