HW News Marathi
देश / विदेश

राज्यसभेसाठी भाजपकडून पियूष गोयल आणि अनिल बोंडे यांच्या नावांची घोषणा

मुंबई। राज्यात राज्यसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर भाजपने राज्यातील दोन राज्यसभा उमेदवारांची आज (२९ मे) नावांची घोषणा केले आहेत. राज्यसभेसाठी भाजपकडून केंद्रीय मंत्री पियूष गोयल आणि राज्याचे माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. भाजपने ट्विट करत महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, बिहार आणि हरियाणा या आठ राज्यातील राज्यसभेच्या उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे.

दरम्यान, शिवसेनेच्या वतीने शिवसेना खासदार संजय राऊत आणि कोल्हापूरचे जिल्हा प्रमुख संजय पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि महाविकासआघाडीच्या नेत्यांच्या उपस्थिती २६ मे रोजी राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज भरला आहे. महाराष्ट्रातून राज्यसभेवर रिक्त होत असलेल्या सहा जागांसाठी १० जून २०२२ रोजी निवडणूक होणार असून अर्ज करण्याची अंतिम तारीख ३१ मे आहे. भारत निवडणूक आयोगाने १२ मे रोजी महाराष्ट्रासह १५ राज्यांतील राज्यसभेवर रिक्त होत असलेल्या एकूण ५७ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अमेरिकेचे संरक्षणमंत्री जेम्स मॅटिस आपल्या पदावरून पायउतार

News Desk

काँग्रेसची सरकार आल्यानंतर आम्ही तिहेरी तलाक कायदा रद्द करू !

News Desk

भारतीय सैन्याकडे निधीची कमतरता ?

News Desk