HW News Marathi
महाराष्ट्र

अहिल्यादेवींची जयंती निमित्ताने त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी चौंडी येथे जमा

मुंबई। समस्त आठरापगड बहुजन समाजाचं दैवत आणि हिंदु संस्कृतीचा जीर्णोधार करणाऱ्या राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवींची जयंती येत्या ३१ मे ला आहे. दरवर्षी प्रमाणे आपण याही वर्षी अहिल्यामातेच्या जन्मस्थळी चौंडी येथे मोठ्या ताकदीनं जमायचे आहे.

या निमित्तानं विस्थापितांना संघर्षाची ताकद देणारा होळकरशाही इतिहास आपल्याला आठवायचा आहे. या इतिहासावर,आपल्या प्रेरणास्थळावर वाकडी नजर टाकणाऱ्यांना आपल्याला जाब विचारायचा आहे.

त्यासाठी मी श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर यांचे मुळ गाव होळ, महाराजा यशवंतराव होळकर यांचे जन्मगाव वाफगाव किल्ला, मल्हारी मार्तंड श्री खंडोबारायाची जेजूरी, सरसेनापती बी.के कोकरे यांचे उंडवडी गाव, अशा विविध ठिकाणी आपल्या इतिहासाचा जागर करत यात्रेला सुरूवात करतो आहे.

दरम्यान, २९ मे ते ३१ मे अशी ही यात्रा असणार आहे. या यात्रेची सांगता पुण्यश्लोक अहिल्यामातेचे चौंडी येथे दर्शन घेऊन होणार आहे. यात्रेत तमाम बहुजन समाजाला आपल्या पराक्रमी इतिहासाचा जागर करायचा आहे. अहिल्यादेवी पर्वाचा जागर करायचा आहे. आणि आपल्या हक्काच्या, अधिकाऱ्याच्या लढ्याला अजून मजबूत करायचे आहे. 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शहीद जवानांविषयी नेहमीच आदराची भावना; माजी सैनिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील! -शंभूराज देसाई

Aprna

नांदेड, परभणी जिल्ह्यातील गारपीटग्रस्त भागांची अशोक चव्हाणांकडून पाहणी

News Desk

‘आधी केलेले पाप धुवून काढा, मगच आशीर्वाद मागा’, राष्ट्रवादीचा भाजपवर घणाघात!

News Desk