HW News Marathi
राजकारण

शिवसेनेला बाजूला ठेवून शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊ शकत नाही! – उद्धव ठाकरे

मुंबई | “शिवसेनेला बाजूला ठेवून शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊ शकत नाही,” अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नवर्निवाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. यावेळी उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदी विराजमान झाल्यानंतर आरे कारशेडचा निर्णय, शिवसेनेचा मुख्यमंत्री, आदी मुद्यांवर भाजपवर घाणाघाती टीका केली आहे. शिंदेंनी मुख्यमंत्री पदी विराजमान झाल्यानंतर उद्धव ठाकरेंनी शिवसेना पक्षप्रमुख म्हणून आज (1 जुलै) पत्रकार परिषद घेतली आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले, “दोन तीन विषय माझ्यामनात आहे, मी आज जनतेसमोर मांडणार आहे. तीन प्रश्न माझ्या समोर आहे. त्यातील पहिला प्रश्न हा आहे. ज्या पद्धतीने जे सरकार स्थापन झाले आणि ज्यांनी हे सरकार स्थापन केले आहे. त्यांच्या मते त्यांनी कथाकथित शिवसैनिकांना मुख्यमंत्री केले. हेच तर मी अडीच वर्षापूर्वी सांगत होतो. हे माझे आणि आमित शहांचे ठरले होते की, सेने आणि भाजपने पुढील पाच वर्ष अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्री पदाचा काळ वाटून घ्यावा. तसे जर झाले असते तर आज अडीच वर्ष झालेली आहे. जे काय घडले ते आज सन्मानाने झाले असते. आताची जोडगोळी यांनी अडीच वर्षपूर्ण केली असते. पहिल्या अडीच वर्षात शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला असता. किंवा भाजपचा झाला असता. मग त्या वेळेला नकार देऊन. आता भाजपने असे का केले असा हा माझ्या प्रमाणे राज्यातील जनतेला पडलेला प्रश्न आहे. की असे का घडले. शिवसेना तुमच्यासोत अधिकृतसोबत होती. लोकसभा आणि विधानसभेत आपण सोबत होतो. या दोन्ही निवडणुकीआधीच जे घडले होते ते हेच ठरले होते. मला कशाला मुख्यमंत्री बनायला लावले. जर तसे घडले असते तर महाविकास आघाडीचा जन्मच झाला नसता. जे आता सुद्धा भाजपसोबत जाऊ इच्छितात किंवा जे गेले. त्यांनी हा प्रश्न स्वत:च्या मनाला विचारावा. अशा पद्धतीने अडीच वर्षापूर्वी त्यांनी शब्द ज्यांनी मोडला. अशा पद्धतीने पाठीत वार करून पुन्हा एकदा शिवसेनेत संभ्रम निर्माण करतायचा की, शिवसेनेचा मुख्यमंत्री तर हा तसा शिवसेनेचा मुख्यमंत्री नाही. कारण शिवसेनेला बाजुला ठेवून शिवसेनेचे मुख्यमंत्री होऊ शकत नाही. हा पहिला महत्वाचा मुद्दा आहे.”

संबंधित बातम्या
एकनाथ शिंदेंनी घेतली महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची शपथ

Related posts

“… माझ्यावर हल्ला करण्याचा कट”, संजय राऊतांचा गंभीर आरोप

Aprna

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण्यांचा उडता प्रचार

News Desk

राहुल गांधींच ‘डबल ए’ तर सीतारामन यांचे ‘आरव्ही’

News Desk