HW News Marathi
राजकारण

“… माझ्यावर हल्ला करण्याचा कट”, संजय राऊतांचा गंभीर आरोप

मुंबई | “बेळगावात बोलावून माझ्यावर हल्ला करण्याचा कट आखला गेला आहे. मला अटके करण्याचा तयारी केली जात आहे”, असा गंभीर आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे. राऊतांना बेळगाव न्यायालयाने सोमवारी (28 नोव्हेंबर)  2018 मध्ये राऊतांना प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी समन्स पाठविला आहे. राऊतांनी आज (29 नोव्हेंबर) माध्यमांशी बोलताना त्यांना बेळगाव न्यायालयाने पाठवलेल्या समन्ससंदर्भात गंभीर आरोप केला आहे. नुकतेच राऊत कथित पत्राचाळ घोटाळा प्रकरणी तीन महिन्यानंतर तुरुंगातून बाहेर आलेले आहेत.

राऊत म्हणाले, “महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न वादावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होती. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी सोलापूर आणि सांगलीतील जत तालुक्यातील 40 गावांवर दावा सांगत आहेत. कर्नाटकातील एका संघटनेनी काल आपल्या राज्यातील गावात येऊन त्यांचे झेंडे फडकावले आणि यावेळी मला बेळगाव न्यायालयाकडून समन्स आले आहे. या मागची क्रोनोलॉजी तुम्ही समजून घ्या. कर्नाटककडून सीमावादाला हवा का दिली जाती?, असा सवालही राऊतांनी माध्यमांशी बोलताना उपस्थित केला. यावर पुढे बोलताना राऊत म्हणाले, “बेळगावात बोलावून माझ्यावर हल्ला करण्याचा कट आखला गेला आहे. मला अटके करण्याचा तयारी केली जात आहे. परंतु, मी घाबरणार नाही, परिस्थितीला मी सामोरे जाईन.  आणि मी बेळगाव न्यायालयात हजर राहणार आहे”, असे त्यांनी ठणकावून सांगितले.

काश्मीर फाइल्स चित्रपटामुळे पंडितांवरील हल्ले वाढले

काश्मीर फाइल्स चित्रपट प्रोपगंडा असल्याचे वक्तव्य इफ्फीच्या प्रमुख ज्युरींनी केले आहे. यासंदर्भात राऊतांना पत्रकारांनी प्रश्न विचारल्यावर ते म्हणाले, “काश्मीर फाइल्स चित्रपटासाठी कोण प्रमोशन करत होते. या चित्रपटाचा प्रचार एकाच पक्षानेच केला दिसत आहे. त्यामुळे हा चित्रपट प्रोपगंडा असल्याचीे नाकारता येत नाही. ज्या काश्मीरी पंडितांवर हा चित्रपट बनविला गेला. यानंतर काश्मिरी पंडितांवरील हल्ले वाढलेले आहेत. यावर काश्मीर फाइल्स ज्यांनी काढले ते काहीच बोलले नाहीत. यावर आता काश्मीर फाइल्स-२ चित्रपट काढावा. आणि काश्मीरमध्ये काय झाले ते सांगावे,” असे राऊत म्हणाले.

 

 

Related posts

गोव्याने आपला ‘चौकीदार’ गमावला, देशातून सचोटीचे प्रयाण झाले !

News Desk

शिवराजसिंह चौहान यांची दुतोंडी भूमिका ?

News Desk

पवारांनी मुंडेंचे घर फोडले, जयदत्त क्षीरसागर यांचा गंभीर आरोप

News Desk