HW News Marathi
महाराष्ट्र

अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांच्यावर आज दुपारी शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार

मुंबई। ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या व पद्मश्री पुरस्काराने सन्मानित सिंधुताई सपकाळ यांचे काल (४ जानेवारी) अखेरचा श्वास घेतला. सिंधुताई सपकाळ यांच्या पार्थिवावर आज (५ जानेवारी) दुपारी १२ वाजता पुण्यात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. अवघ्या महिन्याभरापूर्वी सिंधुताईंवर हर्नियाची शस्त्रक्रिया झाली होती. त्यानंतर त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. सिंधुताई यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने वयाच्या ७४ वर्षी निधन झाले. सिंधुताई सपकाळ यांच्या जाण्याने हजारो अनाथ बालकांची माय हरपली आहे.

अनाथ मुलांसाठी सिंधुताईंनी आपले उभे आयुष्य खर्ची घातले. अत्यंत मायाळू पण तितकंच कणखर असे सिंधुताईंचे व्यक्तिमत्त्व आणि असामान्य काम सगळ्या जगाला भावले, प्रेरणास्थान ठरले. सिंधुताई सपकाळ यांच्यावर पुण्यातील गॅलेक्सी रुग्णालयात उपचार सुरु होते. काही दिवसांपूर्वीच सिंधुताई यांच्यावर गॅलेक्सी रुग्णालयातच हर्नियाचे ऑपरेशन करण्यात आले. त्यानंतर सिंधुताई यांना पुन्हा एकदा गॅलेक्सी रुग्णालयात दाखल करण्यात होते. 

सिंधुताई सपकाळ यांचा अल्प परिचय

सिंधुताई सपकाळ यांचा जन्म १४ नोव्हेंबर १९४७ रोजी महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यातील नवरगाव येथे झाला होता. सिंधुताई सपकाळ यांचा आई- वडीलांनी त्यांचे नाव चिंधी ठेवले. सिंधुताईंचे शिक्षण चौथीपर्यंत झाले आहे. सिंधुताई यांनी १९९४ साली पुण्यातील पुरंदर तालुक्यात अनाथ मुलांसाठी ‘ममता बाल सदन’ नावाची संस्था स्थापन केली. या संस्थेद्वारे सिंधुताई यांनी अनाथ मुलांसाठी त्यांनी काम केले. सिंधुताई सपकाळ यांना जवळपास ७५० आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

हिंगणघाट जळीत कांड प्रकरणाचा घटनाक्रम

swarit

विधान परिषदेच्या सभागृह नेतेपदी अजित पवारांची नियुक्ती

swarit

गर्दीत कोरोना चेंगरून मेला की काय असे मला वाटले!

News Desk