HW News Marathi
राजकारण

“शिवसेना बंडखोरांनी नव्हे, तर भाजपने फोडली,” उद्धव ठाकरेंचा आरोप

मुंबई | “शिवसेनेत फुट ही बंडखोरांनी नव्हे, तर भाजपने फोडली,” असा आरोप शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले आहे. उद्धव ठाकरे यांनी आज (19 जुलै) उत्तर भारतीय एकता मंच आणि शिवसेना व्यापारी संघटना यांची संयुक्त बैठक शिवसेना भवनात बोलविली होती. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षासोबत बंडखोरी केल्यापासून उद्धव ठाकरेंनी बैठकांच्या फैऱ्या सुरू आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले, “शिवसेनेत फुट ही बंडखोरांनी नाही तर भाजपने फोडली. तुम्ही माझ्या भात्यातील कितीही बाण नेहले. भाजप शिवसेना संपवत आहे. भाजप दोन कोंबड्यांमध्ये झुंज लावण्याचे काम ते करत आहेत. त्यातील एक कोंबडा मेला की दुसऱ्या कोबड्याला ते जेलमध्ये टाकतील…संपवतील. अशा प्रकारे शिवसेना संपवण्याचे काम भाजपकडून केले जात आहे. त्यामुळे तुम्ही सतर्क रहा. तुम्ही माझ्या भात्यातील कितीही बाण नेहले, तरी सुद्धा हे बाण चालवण्यासाठी जे धनुष्य लागते ते माझ्याकडे आहे. हे देखील लक्ष्यात ठेवा,” या असे म्हणत सर्वांना एकत्रित राहण्याचे अहवान त्यांनी केले आहे.

उद्धव ठकारे आज सायंकाळी सर्व जिल्हा प्रमुख आणि विभाग प्रमुख यांची बैठक देखील होणार आहे. या बैठकीत उद्धव ठाकरे सर्वांना संबोधित करणार असून महिन्याभरातील जिल्हा प्रमुख आणि विभाग प्रमुख यांची चौथी बैठक आहे. एका बाजुला शिंदे गटात आमदार आणि खाजदार जोडले जात असताना दुसरीकडे शिवसेना वाचवण्यासाठी शिवसेना एकत्रित ठेवण्यासाठीचे प्रयत्न उद्धव ठाकरे यांच्याकडून केले जात आहेत.

संबंधित बातम्या

शिवसेनेच्या 12 खासदारांच्या भेटीनंतर मुख्यमंत्री सायंकाळी घेणार पत्रकार परिषद

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्री फडणवीस विधानसभा बरखास्त करणार ?

News Desk

भैय्यू महाराजांच्या आत्महत्येप्रकरणी त्यांच्याच विश्वासू सेवकाला अटक

News Desk

राजेंद्र गावित यांचा भाजपमधून शिवसेनेत प्रवेश, पालघरमधून उमेदवारी

News Desk