HW News Marathi
महाराष्ट्र राजकारण

गॅस दरवाढीवरुन ‘मविआ’चे आमदार आक्रमक; विधानभवनाच्या पायर्‍यांवर सरकार विरोधात घोषणाबाजी

मुंबई | राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा (Maharashtra Budget Session )चौथ्या दिवस आहे. या अधिवेशन सुरु होण्यापूर्वी महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधीमंडळाच्या पायऱ्यांवर गॅस दरवाढीविरोधात (Gas price hike) आंदोल करत शिंदे सरकारचा निषेध केला आहे. महाविकास आघाडी आमदारांनी शिंदे सरकारच्या गॅस दरवाढीविरोधात आंदोलन करताना सरकारने थापली गॅस दरवाढीची पोली… संपली निवडणुकीचा तडाका,  झाला गॅस दरवाढीचा भडका… रद्द करा रद्द करा…, अशा घोषणाबाजी केली.

 

“होळी रे होळी, सरकारने थापली गॅस दरवाढीची पोळी… संपला निवडणूकीचा तडाका, झाला गॅस दरवाढीचा भडका… रद्द करा रद्द करा… गॅस दरवाढ रद्द करा… खोके सरकार आले सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले… खोके सरकार आले गॅस दरवाढीचे विघ्न आणले…”, पुण्यात नाही चालले खोके उदास झाले बोके…या सरकारचे करायचे काय, गरीबांच्या घरात जेवण नाय… शेतकऱ्यांची लाईट तोडणाऱ्या सरकारचा धिक्कार असो… बळीराजाला द्या लाईट नाहीतर शेतकरी देईल फाईट.. महाराष्ट्राला द्या लाईट नाहीतर शेतकरी करतील टाईट… अशा गगनभेदी घोषणांनी महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाचा परिसर दणाणून सोडला.

 

दरम्यान, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार आणि अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली गॅस दरवाढ विरोधात महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायर्‍यांवर येत शिंदे सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांचे बॅनर फडकवून निषेध केला.

Related posts

सुप्रीम कोर्टाच्या निकालाचा अभ्यास करुन त्यावर प्रतिक्रिया देऊ – गृहमंत्री

News Desk

OBC Reservation : निवडणुकांना स्थगिती नाही; आयोगाकडून नव्या तारखा जाहीर

News Desk

शेतकऱ्यांचा संताप ओळखा, ठाकरेंचा भाजपाला टोला

News Desk