HW News Marathi
राजकारण

“सत्ता तुमच्या बुडाखाली ठेवण्याची राक्षसी महत्वकांक्षा येते, तेव्हा …,” उद्धव ठाकरेंची भाजपवर टीका

मुंबई | “सत्ता तुमच्या बुडाखाली ठेवण्याची राक्षसी महत्वकांक्षा येते. तेव्हा तुम्हला विरोधी पक्षाची भीती वाटू लागते,” अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भाजपवर केली आहे. दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत (Sanjay Raut) यांना उद्धव ठाकरेंनी दिलेल्या मुलाखतीचा दुसरा भाग आज (27 जुलै) सकाळी 8.30 वाजता प्रसारित झाला आहे. उद्धव ठाकरेंच्या आजच्या सामनाची (Saamana) मुलाखतीत एकनाथ शिंदे,  भाजप, केंद्रीय तपास यंत्रणा, बहुमत चाचणी, पालिका निवडणुकीत भगवा फडकणार, आदी मुद्यांवर मत मांडले.

देशातील विरोधी पक्षांना संपवण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा प्रयत्न तर इंदिरा गांधींनी आणबाणीच्या काळात देखील केला नाही, राऊतांच्या प्रश्नवर उद्धव ठाकरे म्हणाले, “आताची परिस्थिती तशीच आहे, विरोधी पक्षापासून सत्ताधाऱ्यांना भीती वाटू लागली. तर तो त्यांचा कमकुवतपणा आहे. लोकशाहीचा अर्थ की प्रत्येक वेळेला शिवसेना म्हणा, भाजप, काँग्रेस, इतर अन्य पक्ष या सर्वांना सातत्याने विजय प्राप्त झाला, असे नाही. विजय होत असतात, पराज्य होत असतात. नवीन पक्ष उदयाला येत असतात. तेही काही काळ चमकतात. हीच तर लोकशाहीची वेगळी गंमत आहे. तुम्हाला सगळी सत्ता तुमच्या बुडाखाली ठेवण्याची जेव्हा म्हणजे राक्षसी महत्वकांक्षा येते. तेव्हा तुम्हला विरोधी पक्षाची भीती वाटू लागते. तर काय होईल, काल मी मुख्यमंत्री होतो, आज मी तुमच्याबरोबर पहिल्यासारखा आहे. काय फरक पडला, सत्ता येते, सत्ता जाते, सत्ता परत येते. वाजपेयींनी म्हटले होते की, ‘सत्ता आती है जाती है, पर देश रेहना चाहीए,’ देश राहण्यासाठी आपण सर्व पक्षांनी मिळून काम नाही केले. तर आपणच आपल्या देशाचे गद्दार आहोत.

 

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचा आणि आनंद दिघे साहेबांच्या विचारांचा विजय..!”, न्यायालयाच्या निर्णयानंतर शिंदेंचे ट्वीट

Aprna

जिथे सत्ता तिथे राधाकृष्ण विखे पाटील !

News Desk

विश्वजित कदम यांनी फेटाळल्या भाजप प्रवेशाच्या चर्चा

News Desk