महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असतात. आता पुन्हा एकदा त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. (Bhagat Singh Koshyari controversial statement) कोश्यारी यांनी वादग्रस्त विधान करताना म्हटलेय, जर गुजराती आणि राजस्थानी नसते तर मुंबईचे आर्थिक महत्व कसे निर्माण झाले असते. यावरुन आता राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.राज्यपालांनी महाराष्ट्राचा (Maharashtra) अपमान केला आहे असं म्हणत विरोधकांसह सामान्य नागरिकांनी त्यांच्यावर सवाल उपस्थित केले आहेत.
अंधेरीत राज्यपाल म्हणाले, “मी लोकांना कधी-कधी सांगत असतो की जर गुजराती आणि राजस्थानींना महाराष्ट्रातून, विशेषत: मुंबई आणि ठाण्यातून बाजुला केले, तर तुमच्याकडे पैसे उरणार नाहीत.”
मुंबईतून गुजराती, राजस्थानी वगळले तर मुंबईकडे काय राहिल ? मुंबई आर्थिक राजधानी कशी राहिल ? असं वक्तव्य कोश्यारींनी केले आहे. गुजराती लोक मुंबईतून गेले तर पैसे राहणार नाहीत, तसेच आर्थिक राजधानी म्हणून मुंबईची ओळख आहे ती राहणार नाही, असं वक्तव्य राज्यपालांनी केल्यानंतर नव्या वादाला तोंड फुटले आहे.
राज्याचा राज्यपाल त्याच राज्याच्या जनतेची बदनामी करतो हे भयंकर
काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत
राज्याचा राज्यपाल त्याच राज्याच्या जनतेची बदनामी करतो हे भयंकर आहे. गुजराती राजस्थानी हा विषय राहू द्या यांनाच सर्वात आधी नारळ दिला पाहिजे. यांच्या कारकिर्दीत राज्यपाल या संस्थेचा व महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेचा स्तर तर खालावला आहेच, पण महाराष्ट्राचा अवमानही सातत्याने झाला आहे. pic.twitter.com/jfM1pQ4p0w
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) July 29, 2022
महाराष्ट्र आणि मुंबईतील माणूस कर्तबगार आणि सक्षम आहे. मराठी माणसाच्या जीवावर अनेक राज्य पोसल्या जातात. आम्ही चटणी भाकर खाऊन पोट भरून इतरांना पोसणारी इमानदार माणसे आहोत. आपण मराठी माणसाचा अपमान केलाय महाराष्ट्राची लवकरात लवकर माफी मागा, असं आमदार मिटकरींनी म्हटलं आहे.
महाराष्ट्र आणि मुंबईतील माणूस कर्तबगार आणि सक्षम आहे. मराठी माणसाच्या जीवावर अनेक राज्य पोसल्या जातात. आम्ही चटणी भाकर खाऊन पोट भरून इतरांना पोसणारी इमानदार माणसे आहोत. आपण मराठी माणसाचा अपमान केलाय महाराष्ट्राची लवकरात लवकर माफी मागा.@BSKoshyari pic.twitter.com/osCB25qC5a
— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) July 29, 2022
कष्टकरी जनतेचा हा अपमान आहे संजय राऊत
महाराष्ट्रात भाजपा पुरस्कृत मुख्यमंत्री होताच मराठी माणूस आणि शिवरायांचा अपमान सुरू झाला..स्वाभिमान अभिमान यावर बाहेर पडलेला गट हे ऐकूनही गप्प बसणार असेल तर शिवसेनेचे नाव घेऊ नका..मुख्यमंत्री शिंदे..राज्यपालांचा साधा निषेध तरी करा.मराठी कष्टकरी जनतेचा हा अपमान आहे..
ऐका .. ऐका… pic.twitter.com/dOvC2B0CFu— Sanjay Raut (@rautsanjay61) July 30, 2022
महाराष्ट्राने गुजराती आणि राजस्थानी लोकांना पोसले आणि मोठे केले. अदानी-अंबानी या राज्यात मोठे झाले. आज हे वक्तव्य करून राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराष्ट्राचा अवमान केला आहे. यासाठी त्यांनी तमाम मराठी बांधवांची माफी मागावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली असून, भाजपने यांना परत बोलवावे, असेही नाना म्हणाले
राष्ट्रवादीकडून राज्यपालांच्या वक्तव्याचा निषेध
खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्यपालांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न राज्यपाल भगतसिंह कोश्यारी करत आहेत,असा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला. राज्यपालांची तक्रार करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी वाट न पाहता ट्विटरवरून आत्ताच्या आताच्या आता पंतप्रधानांकडे पत्र लिहून तक्रार करावी, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
महाराष्ट्राचे राज्यपाल मा. भगतसिंह कोश्यारी यांचे विधान मराठी माणसांना कमी लेखणारे असे आहे. त्यांच्या विधानाचा मराठी माणूस म्हणून मी निषेध करते.याच मुंबईसाठी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात १०५ हुतात्म्यांनी रक्त सांडले. लाखो मराठी माणसांच्या वज्रमुठीमुळे हे शहर उभा राहिले आहे. pic.twitter.com/0fzigFkhKe
— Supriya Sule (@supriya_sule) July 30, 2022
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.