HW News Marathi
महाराष्ट्र

NCB मधील गैरप्रकार उघडकीस आणणार; नवाब मलिकांची आज पत्रकार परिषद

मुंबई। राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक हे  एनसीबीमध्ये सुरू असलेल्या गैरप्रकार संदर्भात आज (२ जानेवारी) सकाळी ११ वाजता पत्रकार परिषदेत घेणार आहे. मलिकांनी याबद्दल ट्विट करत माहिती दिली आहे. मुंबई क्रूझ प्रकरणानंतर मलिकांनी नार्कोटिक्स कन्ट्रोल ब्युरोचे (एनसीबी) प्रादेशिक संचालक समीर वानखेडे यांच्यावर आरोपांची मालिका लावली आहे. मलिकांनी दररोज वानखेडेंच्या जात पडताळणीवरून त्यांच्यावर आरोप केले आहेत. आर्यन खानला अटकेवरून एनसीबीच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले होते.  

मलिकांनी ट्वीटमध्ये म्हटले, “मी उद्या रविवारी, २ जानेवारी २०२२ रोजी सकाळी ११ वाजता पत्रकार परिषद घेणार आहे आणि एनसीबीमध्ये सुरू असलेल्या गैरप्रकार उघड करणार आहे.” दरम्यान, मलिकांनी नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला ३१ डिसेंबर रोजी त्यांनी एक ट्वीट करत फर्जीवाडा विरोधात माझी लढाई सुरू ठेवणार आहे. आणि जनतेला नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या होत्या,” असे त्यांनी म्हटले. 

https://twitter.com/nawabmalikncp/status/1477313641808465920?s=२०

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोरोनाशी लढण्यासाठी हनुमानासारखा पर्वत उचलू नका ,घरात थांबा! अजित पवारांचं आवाहन

News Desk

#MahalaxmiExpress : ५०० प्रवाशांना एनडीआरएफने वाचविले

News Desk

कल्याणराव, सगळ्यांना एकत्र करुन निर्णय घेऊ म्हणाले हा… पवारांचे मिश्किल उत्तर

News Desk