HW News Marathi
राजकारण

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन १७ ऑगस्टपासून सुरू होणार

मुंबई ।  विधिमंडळाचे सन २०२२ चे पावसाळी अधिवेशन (Monsoon Session)  बुधवार दिनांक १७ ऑगस्ट पासून विधान भवन, मुंबई येथे होणार आहे. दिनांक १७ ते २५ ऑगस्ट २०२२ या कालावधीत अधिवेशनाचे कामकाज होणार असून  विधानसभा आणि विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीच्या  काल (११ ऑगस्ट) झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

मुंबईत विधानभवन येथे  विधानसभा आणि विधानपरिषद विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठका झाल्या. यावेळी  विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री सर्वश्री राधाकृष्ण विखे पाटील, चंद्रकांत पाटील, दादाजी भुसे, उदय सामंत, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, विधानपरिषद व विधानसभा कामकाज सल्लागार समितीचे सदस्य, विधानमंडळ सचिवालय प्रधान सचिव राजेंद्र भागवत आदी मान्यवर उपस्थित होते.

दरम्यान, १७ ते २५ ऑगस्ट २०२२ या कालावधीत अधिवेशन होणार असून यामध्ये  शुक्रवार दिनांक १९ ऑगस्ट  रोजी दहीहंडी सुट्टी आणि दिनांक  २०,२१ ऑगस्ट या सार्वजनिक सुट्या आहेत. या दिवशी कामकाज होणार नाही. तर २४ ऑगस्ट रोजी विधिमंडळ कामकाजात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.

या बैठकीत पावसाळी अधिवेशन विधानपरिषद व विधानसभा बैठकांची  तात्पुरत्या दिनदर्शिकेवर चर्चा करण्यात आली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

वसंत मोरेंना अजित पवारांनी राष्ट्रवादीमध्ये येण्याची दिली ऑफर; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

Aprna

पंतप्रधानांचे फक्त दोनच व्यक्तींवर प्रेम, पहिले गांधी-नेहरु आणि दुसरा मी ! 

News Desk

शरद पवारांच्या मते ‘हे’ ३ उमेदवार पंतप्रधान पदासाठी योग्य

News Desk