बीड | शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे (Vinayak Mete) आज अनंतात विलीन झाले आहे. विनायक मेटे यांच्या पार्थिवावर आज (15 ऑगस्ट) बीड येथील राजेगाव या मुळ गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. शोकाकुल वातावरणात विनायक मेटे यांना अखेरचा निरोप दिला. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विनायक मेटेंच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. विनायक मेटेंच्या अंत्यदर्शनासाठी कार्यकर्त्यांची अलोट गर्दी झाली होती.
विनायक मेटेंचा काल अपघाती मृत्यू झाला. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील माडप बोगद्याजवळ विनायक मेटेंच्या गाडीला अपघात झाला होता. या अपघातात विनायक मेटे गंभीर जखमी झाले होते. विनायक मेटेंना जखमी अवस्थेत कामोठेतील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आल होते. रुग्णालयातील डॉक्टरांनी विनायक मेटेंना मृत घोषित केले. या अपघातात विनाटक मेटे आणि यांचा बॉडीगार्ड यांचा मृत्यू झाला असून गाडीचा चालक एकनाथ कमद बचावला आहे. तसेच हा अपघात नेमका कसा झाला याची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. विनायक मेटेंचे पार्थिव मुंबईहून बीड शहरात काल रात्री आणले. मेटेंचे पार्थिव बीड शहरामधील शिवसंग्राम कार्यालयात अंत्यदर्शनासाठी ठेवले होते.
संबंधित बातम्या
शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांचे अपघाती निधन
कसा झाला विनायक मेटेंच्या कारचा अपघात ?
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.