मुंबई | सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीचा आज (३१ डिसेंबर) निकाल हाती आला आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या एकूण १९ जागांपैकी भाजप पुरस्कृत सिद्धिविनायक समुद्धी पॅनलने ११ जागावर विजय मिळाला आहे. तर महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. महाविकासआघाडीच्या सहकार समुद्धी पॅनलने आठ जागांवर विजय मिळवता आला आहे. या सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या १९ जागांसाठी ३९ उमेदवार रिंगणात उतरले. जिल्हा मध्यवर्ती बँकेचे कालच (३० डिसेंबर) मतदान पार पडले. जिल्हा बँकेते ९८.६७ टक्के मतदान झाले होते. तसेच या निवडणुकीत ९८१ पैकी ९६८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता.
या निवडणुकीत जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत आणि विठ्ठल देसाई या दोन्ही उमेदवारांना समान मते मिळाली होती. यानंतर समसमान मते पडल्यानंतर चिट्ठी टाकून आलेल्या निकालात सतीश सावंत पराभूत झाले आहेत. त्याचबरोबर बँकेचे उपाध्यक्ष सुरेश दळवी यांनाही पराभवाचा सामना करावा लागला. या निवडणुकीच्या वेळी शिवसेनेचे सतीश सावंत यांच्या प्रचारादरम्यान शिवसैनिक संतोष परब यांच्यावर हल्ला झाल्या होता. आणि यात नितेश राणेंचे नाव समोर आले होते. नितेश राणेंना काल (३० डिसेंबर) सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळून लावला. गेल्या पाच दिवसांपासून नितेश राणे हे नोट रिचेबल आहेत. आता जिल्हा बँकेच्या निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर आज केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दुपारी तीन पत्रकार परिषद घेणार आहे. आता नारायण राणे यात नेमके काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागेल आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या विजयी उमेदवारांची नावे
१) शेती संस्था मतदारसंघ कणकवली तालुका
विठ्ठल देसाई (भाजप)- विजयी
सतीश सावंत (महाविकास आघाडी) – पराभूत
२) शेती संस्था मतदारसंघ कुडाळ तालुका
विद्याप्रसाद बांदेकर (महाविकास आघाडी) – विजयी
प्रकाश मोर्ये (भाजप)- पराभूत
सुभाष मडव (अपक्ष)- पराभूत
३) शेती संस्था मतदारसंघ सावंतवाडी तालुका
विद्याधर परब (महाविकास आघाडी)- विजयी
गुरुनाथ पेडणेकर (भाजप)- पराभूत
४) शेती संस्था मतदारसंघ मालवण तालुका
व्हिक्टर डान्टस (महाविकास आघाडी) – विजयी
कमलाकांत कुबल (भाजप) – पराभूत
५) शेती संस्था मतदारसंघ वेंगुर्ला तालुका
मनीष दळवी (भाजप) – विजयी
विलास गावडे (महाविकास आघाडी) – पराभूत
६) शेती संस्था मतदारसंघ देवगड तालुका
प्रकाश बोडस (भाजप) – विजयी
अविनाश माणगावकर (महाविकास आघाडी) – पराभूत
७) शेती संस्था मतदारसंघ दोडामार्ग तालुका
गणपत देसाई (महाविकास आघाडी) – विजयी
प्रकाश गवस (भाजप) – पराभूत
८) शेती संस्था मतदारसंघ वैभववाडी तालुका
दिलीप रावराणे (भाजप) – विजयी
दिगंबर पाटील (महाविकास आघाडी) – पराभूत
९) नागरी सहकारी संस्था, नागरी पतपुरवठा संस्था, पगारदार नोकरांच्या संस्था मतदारसंघ
सुशांत नाईक (महाविकास आघाडी) – विजयी
राजन तेली (भाजप) – पराभूत
१०) महिला प्रतिनिधी
प्रज्ञा ढवण (भाजप) – विजयी
अनोरोजीन लोबो (महाविकास आघाडी) – पराभूत
११) महिला प्रतिनिधी
नीता राणे (महाविकास आघाडी)- विजयी
अस्मिता बांदेकर (भाजप)- पराभूत
१२) अनुसूचित जाती जमाती मतदारसंघ
आत्माराम ओटवणेकर (महाविकास आघाडी) – विजयी
सुरेश चौकेकर (भाजप) – पराभूत
१३) इतर मागास मतदारसंघ
रवींद्र मडगावकर (भाजप) – विजयी
मनिष पारकर (महाविकास आघाडी) – पराभूत
१४) विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग मतदार संघ
मेघनाथ धुरी (महाविकास आघाडी) – विजयी
गुलाबराव चव्हाण (भाजप) – पराभूत
१५) सहकारी पणन संस्था शेती प्रक्रिया संस्था व ग्राहक सहकारी संस्था मतदारसंघ
अतुल काळसेकर (भाजप) – विजयी
सुरेश दळवी (महाविकास आघाडी) – पराभूत
१६) औद्योगिक संस्था मजूर संस्था जंगल कामगार संस्था मोटार वाहतूक संस्था मतदारसंघ
गजानन गावडे (भाजप) – विजयी
लक्ष्मण आंगणे (महाविकास आघाडी) – पराभूत
१७) मच्छीमार संस्था सर्व दुग्ध संस्था कुक्कुटपालन, वराहपालन जनावरे पैदास करणाऱ्या संस्था मतदारसंघ
महेश सारंग (भाजप)- विजयी
मधुसूदन गावडे (महाविकास आघाडी)- पराभूत
१८) विणकर संस्था घरबांधणी संस्था देखरेख संस्था तसेच अंतर्भूत नसलेल्या सर्व सहकारी संस्था
संदीप परब (भाजप)- विजयी
विनोद मर्गज (महाविकास आघाडी)- पराभूत
१९) कायद्याखाली नोंदविलेल्या सभासद संस्था सर्व बिगर सहकारी संस्था व व्यक्ती सभासद मतदार संघ
समीर सावंत (भाजप)-विजयी
विकास सावंत (महाविकास आघाडी)- पराभूत
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.