HW News Marathi
Covid-19

भाजप नेते हर्षवर्धन पाटील आणि राधाकृष्ण विखे-पाटील कोरोना पॉझिटिव्ह

बारामती | भारतीय जनता पक्षाचे बडे नेते व माजी मंत्री असलेल्या हर्षवर्धन पाटील तसेच राधाकृष्ण विखे पाटील या दोन्ही नेत्यांना कोरोनाची लागण झाली आहे. हर्षवर्धन पाटलांनी स्वतः ट्विट करत याबद्दलची माहिती दिली आहे. कालच (२९ डिसेंबर) खासदार सुप्रिया सुळे व त्यांचे पूर्ण कुटुंबीय कोरोना पॉझिटिव्ह आले होते. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी कोरोणाची चाचणी केली. त्यात, त्यांचाही कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील व निहार ठाकरे यांचा विवाह मुंबई येथील ताज पॅलेस येथे नुकताच पार पडला होता. विशेष म्हणजे या विवाहाला सुप्रिया सुळे उपस्थित होत्या. राधाकृष्ण विखे पाटील देखील या विवाह सोहळ्याला उपस्थित होते. तर आता विखे पाटीलही पॉझिटिव्ह आल्याची माहिती आहे. इतकंच नव्हे तर राज्यातील अनेक महत्त्वाचे व प्रतिष्ठित मान्यवर या विवाह सोहळ्याला उपस्थित होते. त्यामुळे ही संख्या वाढते की काय? अशी भीती व्यक्त केली जात आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पुण्यातील कन्‍टेन्मेंट झोनमध्‍ये १० ते १७ मे पर्यंत ‘लॉकडाऊन’ची कडक अंमलबजावणी करा !

News Desk

जरा लांबून बोल ना… अजित पवार मनसे नगरसेवकावर का भडकले?

News Desk

ठरलं! जून महिन्यापासून लहान मुलांवर कोव्हॅक्सिनची होणार ट्रायल

News Desk