HW News Marathi
महाराष्ट्र

परळी तहसीलच्या प्रांगणात बसलेल्या बार्टीच्या विद्यार्थ्यांची सहावी राञही अडक्याच्या थंडीत!

बीड | परळी तहसील परिसरात बार्टीच्या संशोधक विद्यार्थ्यांच्या साखळी उपोषणाचा काल (२९ डिसेंबर) सातवा दिवस उजडला खरा पण उघड्या मैदानात थंडीने कुडकुडत सलग सहावी राञ ही काढली माञ प्रश्नमार्गी लागण्याचे नाव नाही घेत ही खेदाने सांगावे वाटते. हे आंदोलन अवैद्य धंदे किंवा कोणा एकाद्या राजकीय पक्षाच्या विचाराच्या विरोधी नाही हे आंदोलन उद्याचा विकसीत भारत निर्माण करणाऱ्या व देशाच भवितव्य घडविणा-या संशोधकाच आहे.किती दिवस या आंदोलकांचा सहनशीलतेचा अंत प्रशासन पाहणार आहे.

राज्य भरातुन उच्च शिक्षित विद्यार्थी पुढील शैक्षणिक संशोधन करण्यासाठी बार्टीच्या विरोधी आंदोलन करत आहेत.सातवा दिवस उजडला परंतु प्रशासनाला जाग का येत नाही.दरम्यान या आंदोलनाला दररोज मोठा पाठिंबा मिळतोय अस असल तरी अद्याप विद्यार्थ्यांना प्रशासना कडुन कुढली हमी किंवा प्रतिसाद मिळत नाही.हे विद्यार्थी आपला संशोधनाचा अभ्यास याच आंदोलन स्थळी करत आहेत हे विद्यार्थी माञ आजही आपल्या न्यायासाठी ठाम आहेत . सामाजिक न्याय मंत्री विध्यार्थ्यांना न्याय देणार का? असा सवालही राज्यभरातुन विध्यार्थ्यांमार्फत उपस्थित होत आहे.सध्या स्थितीला कडाक्याची थंडी पसरली आहे सगळे आपल्या आरोग्याला सांभाळत घरामध्ये बसले मात्र हे विद्यार्थी आपल्या हक्कासाठी रस्त्यावर बसले आहेत.

यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा ही प्रश्न निर्माण झाला आहे.फुले-शाहु-आंबेडकर आंबेडकर चळवळीतील नेते कार्यकर्ते हा सामाजिक न्याय मिळवुन देतील का?हा प्रश्न लवकर नाही सुटला तर या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य येथेच कोलमोडुन जाण्याची शक्यता निर्माण होऊ शकते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

देशाला महाशक्ती बनविण्याच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या डॉ.कलाम साहेबांचं स्वप्न पूर्ण करणे हीच खरी आदरांजली

News Desk

भारतात उत्पन्नातील ४५ टक्के होतात सिगरेटवर खर्च!

News Desk

काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण विधानसभा अध्यक्ष होणार- संजय राऊत

News Desk