HW News Marathi
क्राइम

गुजरात दंगलप्रकरणी तिस्ता सेटलवाड यांना सर्वोच्च न्यायालयाकडून अंतरिम जामीन मंजूर

नवी दिल्ली | गुजरात दंगलीप्रकरणी (Gujarat riots cases) सर्वोच्च न्यायालयाने सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड (Teesta Setalvad) यांना अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला आहे. गुजरात दंगलप्रकरणी खोटी कागदपत्रे तयार करुन अनेकांना त्यामध्ये गोवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप तिस्तावर आहे. न्यायालयाने आज (2 सप्टेंबर) तिस्ताला अंतरिम जामीन मंजूर केलाआहे.

न्यायालयाचे सरन्यायाधीश उदय ललित, न्यायामूर्ती एस. रवींद्र भट आणि न्यायमूर्ती सुधांशू भट यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडली. गुजरात दंगलप्रकरणी खोटी कागदपत्रे तयार करुन अनेकांना त्यामध्ये गोवण्याचा प्रयत्न केला, असा आरोप सेटलवाड यांच्यावर ठेवण्यात आला होता. त्याप्रकरणी २५ जूनपासून सेटलवाड अटकेत होत्या. त्यांनी जामीनासाठी उच्च न्यायालयात अर्ज केला होता. मात्र, उच्च न्यायालयाने ३ ऑगस्टला असलेलली सुनावणी सहा आठवड्यांसाठी पुढे ढकलली होती. त्याविरोधात सेटलवाड यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतलेली. अखेर सर्वोच्च न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर करत दिलासा दिला आहे.

जामीनासाठी दाखल केलेल्या याचिकांची सुनावणी सहा आठवडे पुढे का ढकलली? सामान्य स्वरूपाचा गुन्हा असलेल्या अशा प्रकरणांत एका महिला आरोपीविरोधात सुनावणीला एवढा विलंब का?, असे सवाल न्यायालयाने सुनावणीदरम्यान उपस्थित केले होते. तसेच, तिस्ताविरोधात पोटा अथवा यूएपीएच्या अंतर्गत गुन्हा दाखल केलेला नाही. मग दोन महिन्यांपासून त्यांना कोठडीत का ठेवले, असा प्रश्नही न्यायालयाने गुजरात सरकारला विचारला होता.

Related posts

भावना गवळींचा ईडी चौकशीला नकार; हे आहे कारण

News Desk

झोमॅटोवर मिठाई खरेदी करणं पडल महागात; २ लाख ४० हजार ३१० रुपयांची ऑनलाईन फसवणूकीचा प्रकार समोर

Chetan Kirdat

हत्या करून पत्नीला घरातच पुरले

News Desk