HW News Marathi
क्राइम

अभिनेता करण ओबेरॉयला बलात्कार प्रकरणी अटक, ९ मेपर्यंत पोलीस कोठडी

मुंबई | बॉलिवूड अभिनेता आणि प्रसिद्ध फिटनेस मॉडेल करण ओबेरॉय यांच्यावर बलात्कार प्रकरणामध्ये मुंबईत अटक करण्यात आली आहे. करण ओबेरॉयला एका महिला ज्योतिषीला लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केला असल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी अटक केली आहे. बलात्कार पीडितेचा व्हिडीओ बनवणे आणि तो व्हायरल करण्याची धमकी देऊन ब्लॅकमेल केल्याचा देखील आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला आहे.

ओशिवारा पोलिसांनी त्याला आज (६ मे) दुपारी अटक केली असून त्याला न्यायालयात हजर केले आहे. न्यायालयाने आरोपी करणला ९ मेपर्यंत पोलीस कोठडीची शिक्षा सुनावली आहे. करण ओबेरॉय हा ‘जस्सी जैसी कोई नहीं’ या टीव्ही शोमुळे घराघरात पोहोचला होता. त्याच्याविरोधात मुंबईतील ओशिवारा पोलीस स्थानकामध्ये भादवी कलम ३७६ (बलात्कार) आणि ३८४ (ब्लॅकमेल) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना जामीन मंजूर

Aprna

बायपास सर्जरीनंतर सचिन वाझेनी 3 महिने घरात नजरबंद ठेवण्याची केली मागणी

News Desk

संजय राऊतांचा जामीन रद्द होणार? पत्राचाळ घोटाळाप्रकरणी आज हायकोर्टात सुनावणी

Chetan Kirdat