HW News Marathi
महाराष्ट्र

नितेश राणेंना जामीन की अटक? उद्या निर्णय

सिंधुदुर्ग । शिवसैनिक संतोष परब हल्ल्याप्रकरणी मुख्य आरोपी म्हणून भाजप आमदार नितेश राणे यांच्यावर आरोप आहे. या प्रकरणी नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. या अटकपूर्व जामिनावर आज (२९ डिसेंबर) सुनावणी झाली असून उद्या निर्णय जाहीर होणार आहे.

नितेश राणेंच्या जामीन अर्जावर काल (मंगळवारी) दुपारपासून न्यायालयात युक्तिवाद सुरु आहे. काल न्यायालयाची वेळ संपल्यामुळे आज पुन्हा या युक्तिवादाला सुरुवात झाली होती. मात्र, सरकारी वकील आणि नितेश राणेंचे वकील या दोघांचाही युक्तिवाद आता पूर्ण झाला असून आजची सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. आता उद्या या जामीन अर्जावरचा निर्णय जाहीर करणार आहे. त्यामुळे नितेश राणेंना जामीन मिळणार की अटक होणार, हे आता उद्याच स्पष्ट होईल. दरम्यान, ज्यांच्यावर हल्ला झाला ते संतोष परब न्यायालयातून बाहेर पडताना माध्यमांसमोर आले मात्र, पत्रकारांच्या प्रश्नास उत्तर देण्यास त्यांनी नकार दिला.

काय आहे प्रकरण?

18 डिसेंबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांचे समर्थक शिवसेना कार्यकर्ते संतोष परब यांच्यावर कणकवली येथे चाकूने वार करण्यात आले. या प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन सातपुते याला दिल्लीहून अटक करण्यात आली असून सहा संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच नितेश राणे आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश ऊर्फ गोट्या सावंत यांचाही या प्रकरणात सहभाग असल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली असून या दोघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, नितेश राणे हे नेमके कुठे आहेत, याचा अद्याप शोध लागलेला नाही. 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शरद पवार गेली ५० वर्षे राजकारणात आहेत मग त्यांनी मराठ्यांना आरक्षण का दिले नाही? 

News Desk

टीईटी परीक्षेतील अनियमितता प्रकरणी चौकशीसाठी अपर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित

Aprna

छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातलं हे सर्वात घाबरट सरकार  

News Desk