HW News Marathi
महाराष्ट्र

नारायण राणेंनी गुन्हेगारांना पाठिशी घालू नये; संजय राऊतांचा निशाणा

नाशिक । सिंधुदुर्गातील शिवसैनिकावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी भाजपा आमदार नितेश राणे यांच्या अटकेवर टांगती तलवार आहे. मात्र, नितेश राणे यांचा ठावठिकाणा माहिती नसून पोलीस यंत्रणा त्यांचा शोध घेत आहे. नितेश राणे यांच्या ठावठिकाणा बाबत त्यांचे पिता व केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना विचारण्यात आले असता हे सांगायला मी मूर्ख आहे का?, असा उलट सवाल केला. याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नितेश राणे यांच्यासह नारायण राणे यांच्यावर निशाणा साधला आहे.

नारायण राणे यांना काल (२८ डिसेंबर) पत्रकार परिषदेत नितेश राणे कुठे आहेत, असा प्रश्न विचारण्यात आला. यावेळी राणे म्हणाले, नितेश कुठे आहे हे सांगायला मी मूर्ख वाटलो का? मला माहित असलं तरी सांगणार नाही, असं विधान केलं. त्यांच्या या बोलण्यावरून नितेश राणे कुठे आहेत, हे नारायण राणेंना १०० टक्के माहित आहे, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी नारायण राणेंना कणकवली पोलिसांनी नोटीस बजावली आहे. तर राणेंच्या या विधानावर आक्षेप घेत नारायण राणेंनी कायद्याचं उल्लंघन केलं असल्याचं संजय राऊत म्हणाले.

नितेश पाताळात लपले तरी शोधून काढू

नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलताना राऊत म्हणाले, पोलिसांना हवा असलेला एक संशयित आरोपी, मग तो कुणीही असेल, हत्येचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्याप्रकरणी पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. पण, केंद्रीय मंत्री म्हणतायत की तो कुठे आहे हे मी सांगणार नाही. हे कायद्याचं उल्लंघन आहे. तुम्ही देशाचे केंद्रीय मंत्री आहात, राज्याचे मुख्यमंत्री होता. गुन्हेगारांना पाठिशी घालू नका. कायद्याला सहकार्य करणं हे आपलं सगळ्यांचं कर्तव्य आहे”, असा टोला संजय राऊतांनी नारायण राणेंना लगावला आहे. तसेच नितेश पाताळात लपले असतील तरी त्यांना शोधून काढू, असा दावाही यावेळी राऊतांनी केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

FDA कमिशनर अभिमन्यू काळे यांची तडकाफडकी बदली, परिमल सिंह नवे आयुक्त

News Desk

‘त्या’ विधानावर दत्तात्रय भरणेंचं स्पष्टीकरण….!

News Desk

…आणि राज ठाकरे नाशिकच्या महापौरांना सांगितलं ‘मास्क काढ’!

swarit