HW News Marathi
महाराष्ट्र राजकारण

“नवनीत राणा ‘सी’ ग्रेड फिल्म करणाऱ्या, एक आमदार भाळला आणि…”; शिवसेनेने फटकारले

मुंबई | मुंबई महापालिका निवडणुकीत (BMC Election 2022) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा सर्वनाश होणार, असे वक्तव्य करून स्वतःला किरकोळ प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या नवनीत राणा (Navneet Rana) यांचा शिवसेना प्रवक्त्या संजना घाडी (Sanjana Ghadi) यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. “नवनीत राणा जरा तोंड सांभाळून बोला. कोण आहात आपण “सी” ग्रेड फिल्ममध्ये काम करणाऱ्या एक अभिनेत्या. एक आमदार आपल्यावर भाळला आणि राजकारणात आपला चंचू प्रवेश झाला”, असा जोरदार हल्लाबोल संजना घाडी यांनी केला आहे.

‘राणा दाम्पत्य आणि मातोश्री’ हा वाद उभ्या महाराष्ट्राने पाहिला आहे. अजूनही जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा तेव्हा नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा हे हनुमान चालीसावरून उद्धव ठाकरेंवर टीका करताना पाहायला मिळतात. आता सत्तांतर झालं असलं तरी देखील राणा दाम्पत्य ठाकरेंवर निशाणा साधत आहेतच. नुकतंच नवनीत राणा यांनी “तू ठाकरे है तो मैं भी राणा हूं” असं म्हणत उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख करत टीकास्त्र डागलंय. नवनीत राणांच्या या सततच्या टीकेवरून आता शिवसेना प्रवक्त्या संजना घाडी यांनी राणांना सुनावलं आहे.

संजना घाडी म्हणाल्या, “काय संबंध आपला हनुमान चालीसाशी? हनुमानाला हनुमान का म्हणतात? याचं साधं उत्तर मुलाखतीमध्ये आपल्याला देता आलं नाही आणि म्हणे मी हनुमान भक्त. भाजपाच्या ‘सी’, ‘डी’ टीम म्हणून काम करणाऱ्या मनसेने भोंग्यांच्या विषयासाठी मशिदीसमोर हनुमान चालीसा वाचा म्हणून सांगितलं. पण तुम्ही डायरेक्ट मातोश्रीवर हनुमान चालीसा वाचायला निघालात. ज्या बाईला लाखो शिवसेनिकांचे श्रद्धास्थान असलेलं ‘मातोश्री’ या मंदिरातला आणि मशिदीतला फरक कळत नाही त्या बाईला आणखी कशी वागणूक मिळायला पाहिजे होती. तुम्ही म्हणाल शिवसेनेने काँग्रेस, राष्ट्रवादीबरोबर आघाडी केली वगैरे वगैरे म्हणून मातोश्री आणि मातोश्रीचे विचार हिंदुत्ववादी राहिले नाहीत, बाळासाहेबांचे राहिले नाहीत, पण याच मातोश्रीवर माननीय बाळासाहेबांनी मुस्लिम कुटुंबीयांना त्यांची नमाजाची वेळ झाल्यानंतर नमाज अदा करण्याची विनंती केली होती आणि त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत नमाज अदा केला देखील. हे तुमच्यासारख्या ‘मुंबईची मुलगी’ म्हणवून घेणाऱ्या बाईला माहिती पाहिजे.”

“आता फड उभा करून कमळाबाईची सुपारी वाजवते”

तसंच पुढे घाडी म्हणाल्या की, “ही मुंबईची मुलगी कदाचित त्यावेळी ‘C’ ग्रेड फिल्म करण्यात बिझी होती. आणि आता फड उभा करून कमळाबाईची सुपारी वाजवते. हे महाराष्ट्र आणि मुंबईला पक्के कळाले आहे. कावळीणीच्या शापाने गाय मरत नसते बाई..! त्यामुळे माझ्या शापामुळे, माझ्यावर झालेल्या अन्यायामुळे शिवसेनेला कार्यकर्ता उरला नाही अशा फाजील वल्गना करून थेर महाराष्ट्राला दाखवू नका. शिवसेना ही कालही मजबूत होती, आजही मजबूत आहे आणि तुमच्यासारख्या 100 दुश्मनांच्या छाताडावर उभी राहून पुन्हा एकदा या मुंबई, महाराष्ट्रावर आपला भगवा डौलाने फडकत ठेवणार आहे. कितीही शूर्पणखा अंगावर आल्या तरी त्यांची नाक कापून….”, असे शिवसेना उपनेता व प्रवक्ता संजना घाडी म्हणाल्या.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“…तर राज्यपालांनी पदावर राहण्याबाबत गांभीर्याने पुनर्विचार करण्याची वेळ आली”, अजित पवारांची टीका

Aprna

उत्तर भारतीयाला मारहाण केल्याप्रकरणी ३ शिवसैनिकांना अटक

Gauri Tilekar

ठरलं ! MPSC परीक्षेचे सुधारित वेळापत्रक जाहीर

News Desk