HW News Marathi
महाराष्ट्र

शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केला प्राणघातक हल्ला; रोहिणी खडसेंचा गंभीर आरोप

मुंबई | राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांच्यावर काल (२७ डिसेंबर) रात्री प्राणघातक हल्ला झाला. या हल्ल्यात रोहिणी खडसेंना आज (२८ डिसेंबर) पत्रकार परिषद घेऊन त्यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याचा घटनाक्रम सांगून शिवसेनेचे आमदार आणि पदाधिकाऱ्यावर आरोप केला आहे. रोहिणी खडसे म्हणाले, “तीन दुचाकीवरून सात जण आले, एकाच्या हातात पिस्तूल, दुसर्‍याच्या हातात तलवार तर तिसऱ्या च्या हातात लोखंडी रॉड होता. तर यातील तीन जण शिवसेनेचे पदाधिकारी होते,” असा आरोप त्यांनी केला आहे. 

खडसे म्हणाल्या, “एकाने माझ्यावर पिस्तूल रोखले आणि कारचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. परंतु, कारचा दरवाजा उघडता आला नाही, यानंतर हातात रॉड असलेल्या व्यक्तीने माझ्यावर जोराने हल्ला केला. हे तीन जण मला मारण्यासाठी आल्याचे त्यांनी म्हटले आहे. माझ्यावर केलेला हल्ला हा मला घाबरविण्यासाठी होता मात्र मी या हल्ल्याने घाबरणारी नाही. मी महिलांच्या पाठीशी आहे. अशीच कायम उभी राहीन, असेही ते म्हटले. हा हल्ला शिवसेना विधानसभा क्षेत्रप्रमुख सुनील पाटील, पंकज कोळी व छोटू भोई यांचा नावाचा रोहिणी खडसेंनी उल्लेख केला आहे. राजकीय वैमनस्य आणि वादातून शिवसेना पदाधिकार्‍यांनी हा हल्ला केल्याचा आरोप रोहिण खडसेंनी केला आहे. 

नेमके काय घडले रोहिणी खडसे

या काल चांगदेव येथून एका हळदीच्या कार्यक्रमानंतर मुक्ताईनगरकडे परतत असताना सूत गिरणी परिसरात दोन मोटार सायकलवर आलेल्या काही अज्ञातांनी त्यांच्या गाडीवर दगडफेक केली. हल्लेखोर एवढयावरच नाही थांबले तर त्यांनी रॉडने देखील त्यांच्या गाडीवर हल्ला केला. या घटनेनंतर त्यांच्या वाहन चालकाने रस्त्याच्या बाजूने गाडीसह शेतात पलायन केले. त्यामुळे रोहिणी खडसे आणि त्यांचा चालक सुखरुप बचावले, अशी माहिती खडसे कुटुंबीयांनी दिली आहे. तसेच हल्लेखोरांनी सुद्धा अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पळ काढला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजपमध्ये प्रवेश करणा-या १० आमदारांना शहांनी दिला ‘हा’ मोलाचा सल्ला

News Desk

रामकथा हे आमचे राष्ट्रीय चारित्र्य! – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Aprna

फडणवीस सरकारच्या काळात मंत्रालयात वसुलीसाठीच संघाचे लोक नेमले होते का? याची चौकशी करावी

News Desk