HW News Marathi
महाराष्ट्र

…आणि परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा केले 50 हजार!

मुंबई। मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी लेटर बॉम्ब टाकून राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना घरचा रास्ता दाखवला. पण, आता परमबीर सिंग सुद्धा अडचणीत सापडले आहे. कोर्टाच्या आदेशानंतर आज त्यांनी मुख्यमंत्री कोविड सहायत्ता निधीमध्ये जमा केले.

50 हजारांचा दंड ठोठावण्यात आला होता

परमबीर सिंग यांच्यावर वेगवेगळे गुन्हे दाखल झाले आहे. या प्रकरणी सुनावणी सुरू आहे. त्यांचे वकील अनुकूल सेठ यांनी दिलेल्या माहितीनुसार, परमबीर सिंग हे राज्य सरकारने नेमलेल्या चौकशी समितीसमोर हजर झाले नव्हते. त्यामुळे त्यांना 50 हजारांचा दंड ठोठावण्यात आला होता. या दंडाची रक्कम त्यांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करण्यास सांगितले होते. त्यानंतर सिंग यांनी आज हा निधी जमा केला आहे, असं वृत्त महाराष्ट्र टाइम्सने दिलं आहे.

परमबीर सिंग एकदाही हजर राहिले नाही

परमबीर सिंग यांनी सचिन वाझे मार्फत अनिल देशमुख यांनी 100 कोटी वसुली करण्याचे सांगितले होते, असा गंभीर आरोप केला होता. या प्रकरणाची चौकशीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हायकोर्टाचे निवृत्त न्यायमूर्ती के. चांदिवाल यांची चौकशी समिती स्थापन केली होती. पण परमबीर सिंग एकदाही हजर राहिले नाही त्यामुळे त्यांना हा दंड ठोठावला होता.त्याचबरोबर परमबीर सिंग यांच्याविरोधात चौकशीला मुंबई हायकोर्टात आवाहन देण्यात आले आहे. याबद्दल याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे चौकशी आयोगाने 7 सप्टेंबरपर्यंत सुनावणीला स्थगिती दिली आहे. त्याचवेळी 7 सप्टेंबरला सुनावणी होणार आहे. त्यामुळे परमबीर सिंग यांना चौकशीला हजर राहावे लागणार आहे, अन्यथा दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शरद पवार उद्या दिल्लीत विरोध पक्षांची बैठक घेणार

News Desk

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ४.३० वाजता ‘वर्षा’वर महत्वाची बैठक

News Desk

मुख्यमंत्र्यांनी घरातून बाहेर पडण्याचा सल्ला देणाऱ्या मनसैनिकाला दादा भूसेंचे प्रत्युत्तर

News Desk