HW News Marathi
महाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ४.३० वाजता ‘वर्षा’वर महत्वाची बैठक

मुंबई | पावसाने महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पूर आला. काल (२५ जुलै) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चिपळूणचा दौरा केला होता. यावेळी त्यांनी पुरस्थितीची पाहणी केली होती. आज (२६ जुलै) मुख्यमंत्री पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर जाणार होते. मात्र, कोयनानगरहून हेलिकॉप्टर माघारी पुण्याला फिरवावं लागलं. साताऱ्यात वपावसाला सुरुवात झाल्याने हेलिकॉप्टर उतरवण्यास अडचणी येत होत्या त्यामुळे हा दौरा तात्पुरता थांबवण्यात आला. दरम्यान, आज ४.३० वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या वर्षा या निवासस्थानी पार पडणार आहे. या बैठकीत मुख्यमंत्री आपत्कालिन विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार आहेत. तसेच, राज्यातील पुरस्थितीचा आढावा घेणार आहेत.

पावसामुळे मुख्यमंत्र्यांचा सातारा दौरा रद्द, ठाकरे ही म्हणाले, मी पुन्हा येईन….

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा कोयनानगर दौऱ्यावर होते. हेलिकॉप्टर खराब वातावरणामुळे मुख्यमंत्री ठाकरे यांचे हेलिकॉप्टर परत पुण्याकडे रवाना झाले आहे. जोराचा पाऊस, वारा व ढगाळ वातावरणाने दौरा रद्द झाल्याचे शासकीय सुत्रांनी सांगितले. मुख्यमंत्री ठाकरे यांच्या पाहणी दौऱ्याला ढगाळ वातवरणाचा फटका बसला आहे. मात्र, हेलिकॉप्टर पुण्याकडे परत फिरले असले तरी दौरा रद्द झालेला नाही. असे शासकिय यंत्रणेकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुन्हा दौऱ्यावर येणार आहेत.

मुख्यमंत्र्यांचा दौरा असल्याने सकाळपासूनच सर्व विभागांचे अधिकारी कोयनेत ठाण मांडून बसले होते. हेलिकॉप्टर कोयनेत आले व घिरट्या घालू लागले.मात्र, खराब हवामानामुळे ते उतरू न शकल्याने हा दौरा रद्द झाल्याचे सांगितले जात आहे. मात्र, दौरा रद्द झाल्याचे अधिकाऱ्यांना माहिती नसल्याने सर्व अधिकारी पावसातच मुख्यमंत्र्यांची वाट पहात थांबले होते. सध्या कोयनानगर परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. मात्र, हेलिकॉप्टर पुण्याकडे परत फिरले असले तरी दौरा रद्द झालेला नाही. असे शासकिय यंत्रणेकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुन्हा दौऱ्यावर येणार आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

…तोपर्यंत मी फेटा बांधणार नाही !

News Desk

महाविकास आघाडीच्या सर्व आमदारांशी मुख्यमंत्री टप्प्याटप्प्याने बोलणार – अनिल परब

News Desk

राज्यात ‘कोरोना’बाधितांची संख्या ११६ वर, सांगलीतील एकाच कुटुंबातील ५ जणांना संसर्ग

swarit