HW News Marathi
व्हिडीओ

Uddhav Thackeray यांनी Narayan Rane आणि Raj Thackeray यांना धारेवर धरलं, काय बोलले ते पाहा

केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी काढलेल्या जन आशीर्वाद यात्रेवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टीका केली आहे. केवळ बोंबलून आशीर्वाद मिळत नाहीत. त्यासाठी कामं करावी लागतात, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राणेंना नाव न घेता लगावला. मनसे आणि भाजपने कोरोनाचे नियम मोडून दहीहंडी उत्सव साजरी केली. त्यावरूनही मुख्यमंत्र्यांनी टीका केली. कोरोनाचे नियम मोडून आम्ही करून दाखवलं असं सांगायला हे काही स्वातंत्र्य युद्ध नाहीये. हे काही स्वातंत्र्य मिळून दाखवलं नाही. त्यासाठी आंदोलन केलं असतं तर भाग वेगळा. कोरोनाचे नियम सरकारने का घालून दिले आहेत? याचा थोडा तरी विचार करायला पाहिजे ना. निर्बंधांना विरोध करायला फुकट कोरोना वाटप करण्याचा हा काही सरकारी कार्यक्रम नाहीये, अशी टीका त्यांनी मनसे आणि भाजपचे नाव न घेता केली.

#UddhavThackeray #RajThackeray #NarayanRane #Dahihandi2021 #MNS #BJP #PratapSarnaik #SanjayRaut #Shivsena #Samana

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्याच्या विविध विद्यापीठांतील परीक्षा ऑफलाइनच होणार- Uday Samant

News Desk

ED च्या माजी अधिकाऱ्याला भाजपकडून उमेदवारी; Rohit Pawar यांचा आरोप

News Desk

Supreme Court On MaharashtraGovt | सर्वोच्च न्यायालय उद्या देणार राज्यातील ‘सत्ता’संघर्षावर अंतिम निर्णय

Gauri Tilekar