HW News Marathi
राजकारण

व्हायरल फोटोबाबत श्रीकांत शिंदेंचे स्पष्टीकरण, म्हणाले…

मुंबई | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे चिरंजीव आणि खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ” खासदार श्रीकांत शिंदे यांना सुपर सीएम झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा”, असे ट्वीट करत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते रविकांत वरपे यांनी टीका केली. यानंतर  राज्याचे राजकारण तापल्याचे लक्ष्यात आल्यानंतर खुद श्रीकांत शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन यावर स्पष्टीकरण दिले.

श्रीकांत शिंदे म्हणाले, “आणि हा फोटो शासकीय कार्यालयातला नाही. हे घरचे ऑफिस आहे. हे ऑफिस आम्ही दोघेही यांचा वापर करतो. आणि गेली अनेक वर्ष बसतो आणि लोकांचे प्रश्न सोडवितो. मुख्यमंत्री आज एक व्हीसी होती. यासाठी ‘महाराष्ट्र शासनाचा’ बोर्ड मागे ठेवला होता. परंतु, हे मला माहिती नव्हते. मुख्यमंत्री हे 18 तास काम करतात. आणि विरोधकांना सरकारव टीका करण्यासाठी बाकी काही मुद्दे मिळत नाही. त्यामुळे विरोधक हे असे मुद्दे काढले जात आहे. परंतु, लोकांचा मुख्यमंत्र्यांवर विश्वास आहे.

रविकांत वरपेंनी ट्वीटमध्ये म्हणाले, “खा.श्रीकांत शिंदे यांना सुपर सीएम झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा. मुख्यमंत्र्यांच्या गैरहजेरीत त्यांचे चिरंजीव मुख्यमंत्री पदाचा कारभार सांभाळतात.लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम सुरूय.हा कोणता राजधर्म आहे?असा कसा हा धर्मवीर?”, असा प्रश्न विचारत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांना टॅग केले आहे. 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘नमो’ टीव्हीच्या प्रसारणाविरोधात काँग्रेस-आपने केली निवडणूक आयोगाकडे तक्रार

News Desk

तिहेरी तलाकच्या नव्या विधेयकावर आज लोकसभेत चर्चा

News Desk

आदिवासींच्या हितासाठी ओडिसा सरकारने निवडणुकांची वाट पाहू नये !

News Desk