नवी दिल्ली | महाराष्ट्रातील (Maharashtra) सत्तांतरावर सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) आज सुनावणी होणार आहे. न्यायालयात आज (27 सप्टेंबर) होणारे कामकाजाचे थेट प्रक्षेपण होणार आहे. महाराष्ट्रातील सत्तांतर हे देशाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे मानले जाते. त्यामुळे थेट प्रक्षेपण करण्याचा निर्णय न्यायालयाने घेतला आहे. यावर सरन्यायाधीश उदय लळित यांनी काल (6 सप्टेंबर) तातडीची सुनावणी घेण्याचे आदेश दिले आहेत.
राज्यातील सत्तांतर, आमदार अपात्रता आणि खरी शिवसेना कोणाची या पाच मुद्यांवर न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्याचबरोबर शिंदे गटाने पक्षासोबत बंडखोरी केल्यापासून आपली शिवसेना ही खरी शिवसेना असल्याचा दावा केला असून याबाबत निवडणूक आयोगापुढे सुनावणी प्रलंबित आहेत. या या प्रकरणावर न्यायमूर्तीं धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली पाच न्यायमुर्तींच्या घटनापीठासमोर सुनावणी पार पडणार आहे. यात चंद्रचूड यांच्यासह न्यायमूर्तीं एम.आर. शहा, न्यायमूर्तीं कृष्ण मुरारी, न्यायमूर्तीं हिमाकोहली आणि न्यायमूर्तीं पी. नरसिंहा यांचा समावेश आहे. गेल्या तीन महिन्यांपासून राज्यातील सत्तांतरवर सुनावणी लांबणीवर जात आहे. या प्रकरणावर आज काय निर्णय येईल, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागेल आहे.
महाराष्ट्रातील सत्तांतरावरील पुढील सुनावणी 27 सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलली
महाराष्ट्रातील सत्तांतरावर सर्वोच्च न्यायालयात आज पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर होणार सुनावणी
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.