नवी दिल्ली | राज्यस्थानचे (Rajasthan) मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) हे काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढणार नसल्याची घोषणा केली आहे. गेल्या काही दिसवांपासून गेहलोत हे काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या रेसमध्ये त्यांच्या जोरदार चर्चा रंगली होती. परंतु, गेहलोत यांनी आज (29 सप्टेंबर) दिल्ली जाऊन काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली. “राजस्थानमधील राजकीय घडामोडी लक्षात घेता, मी काँग्रेस अध्यक्षाची निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला”, असे गेहलोत यांनी सोनिय गांधीच्या भेटीनंतर सांगितले.
अशोक गेहलोत म्हणाले, “मी कोचीमध्ये राहुल गांधींना भेटलो आणि त्यांना काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक लढण्याची विनंती केली होती. परंतु, त्यांनी ते मान्य केले नाही. यानंतर मी म्हणालो की मी निवडणूक लढेन. पण, आता राजस्थानमधील राजकीय घडामोडी लक्षात घेता. मी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे.”
I met Rahul Gandhi in Kochi & requested him to fight in the polls (for Congress President). When he didn't accept, I said I'll contest but now with that incident (#RajasthanPoliticalCrisis), I've decided not to contest the elections: Rajasthan CM Ashok Gehlot, in Delhi pic.twitter.com/2VnqTcQUAu
— ANI (@ANI) September 29, 2022
राजस्थानचे मुख्यमंत्री म्हणून तुम्ही कायम राहणार का?, असा प्रश्न गेहलोत यांनी पत्रकारांनी विचारल्यावर ते म्हणाले, “मी ते ठरवणार नाही. हा निर्णय काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी घेणार आहेत. मी सोनिया गांधींसमोर आज झालेल्या बैठकीत सर्व मुद्दे मांडले आहे. यामुळे आता गेहलोत काँग्रेसच्या अध्यक्ष पदाच्या रेसमधून बाहेर झाल्यानंतर शशि थरूर आणि दिग्विजय सिंह या दोघांपैकी नेमके कोण अध्यक्ष होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.