HW News Marathi
राजकारण

“शरद पवारांच्या महाराष्ट्र दौऱ्यानंतर पुन्हा सत्तेत येऊ”, सुप्रिया सुळेंचा विश्वास

मुंबई | “शरद पवार यांचा महाराष्ट्र दौऱ्यानंतर पुन्हा सत्तेत येऊ”, असे विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केला आहे. सुप्रिया सुळेंच्या विधानमुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. सुप्रिया सुळेंचे हे विधान बारामतीतील इंदापूर तालुक्यातील निरनिमगाव एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.

सुप्रिया सुळे म्हणाले, “मी त्यांना नेहमी सांगते की, महाराष्ट्राने तुम्हाला इतके प्रेम दिले. परंतु, तुम्ही विरोधी बाकांवर असताना राज्यातील जनतेने तुम्हाला जास्त प्रेम दिले. आणि हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले आहे. कारण महाराष्ट्राचे त्यांचे राजकारण आणि समाजकारण जर पाहिले. तर त्यांच्या 55 वर्षाच्या काळात जेवढे चढ उतार आहेत. 55 वर्षात 27 वर्ष सत्तेमध्ये होते तर 27 वर्ष विरोधात गेली आहे. विरोधात असताना त्यांनी राज्याचा दौऱ्यावर निघतात. तर त्या दौऱ्यामध्ये काय गंमत होते ते तुम्हाला माहिती नाहीत. काही दिवस शरद पवार यांचा महाराष्ट्र दौऱ्यानंतर पुन्हा सत्तेत येऊन बसू.”

दरम्यान, 2019 च्या निवडणुकीत शरद पवारांच्या सातारा दौऱ्याची देशभरात दखल घेतली. यानंतर विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी बऱ्यापैकी यश मिळाले. यानंतर राज्यात शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचा जन्म झाला.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

फडणवीस सरकारचा कहर, दुष्काळाची पाहणी टॉर्चच्या प्रकाशात

swarit

अरविंद सुब्रमण्यन यांचा राजीनामा

News Desk

आज थेट ‘शिवसेना भवनावर’ धडकला विना अनुदानित शाळांच्या शिक्षकांचा मोर्चा

News Desk