मुंबई । नगरपालिका निवडणुकांमुळे राज्यातील राजकिय वातावरण चांगलंच पेटलं आहे. त्यातच, सातारा नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यातील मिश्कील टिकांचं सत्र काही थांबायचं नाव घेत नाहीय. खरंतर हे दोन्ही राजे सातत्याने विविध मुद्द्यांवरून एकमेकांना डिवचत असतात. आताही विकासकामांच्या उद्घाटनांवरून दोन्ही नेते एकमेकांवर टीका करतायत. नुकतंच शिवेंद्रराजेंवर निशाणा साधताना उदयनराजे भोसलेंनी “काय बाई सांगू कसं गं सांगू” गाणं गायलं. यावेळी सभागृहात मोठा हशा पिकला. त्यावर शिवेंद्रराजेंनी प्रत्युत्तर नाही दिलं तर नवलच.
उदयनराजेंना प्रत्युत्तर देण्यासाठी शिवेंद्रराजे पुढे सरसावले आहेत. शिवेंद्रराजे म्हणाले, “बजेट नसून तांत्रिक मान्यता नसल्याचं सांगत नारळ फोडून, गाणी गाऊन लोक मोकळी झाली. ‘काय बाई सांगू’ वगैरे गाणी गाण्यापेक्षा तुम्हाला नक्की लाज कशाची वाटते हे सातरकरांना कळू दे. नेहमीच्या टॅकटीक्स झाल्यात या. दहा मिनिटं रडायचं आणि जाताना पप्पी घ्यायची हे नेहमीचं झालं आहे. या सर्व मुद्द्यावरुन टीका होऊ लगालीय. तुम्ही कामांचं बोला. पाच वर्ष तुम्हाला सत्ता दिली तुम्ही भ्रष्टाचारमुक्त पालिका करणार होतात त्याचं काय झालं? ते कुठं गेलं?”, असा सवाल करत शिवेंद्रराजेंनी उदयनराजेंवर सडकून टीका केली आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.