HW News Marathi
महाराष्ट्र

पाटण विधानसभा मतदार संघातील पाणी पुरवठा योजनांचा शंभूराज देसाईंनी घेतला आढावा

सातारा | पालकमंत्री तथा राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी सूचित केलेल्या पाटण विधानसभा मतदार संघातील जलजीवन मिशन अंतर्गतच्या पाणी पुरवठा योजनांचा आढावा येथील शासकीय विश्रामगृहात घेतला. या आढावा बैठकीला जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त महादेव घुले, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक सुषमा देसाई, जिल्हा नियोजन अधिकारी शशिकांत माळी यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

 

पालकमंत्री देसाई म्हणाले, पाटण विधानसभा मतदार संघात जलजीवन मिशन अंतर्गत एकूण 84 कामे मंजूर आहेत. डोंगरी भागात फेब्रुवारी महिन्यानंतर पाणी टंचाई भासते ही पाणी टंचाई भासू नये व नागरिकांना पिण्याचे पाणी सहज उपलब्ध व्हावे यासाठी पाणी पुरवठा योजनांची कामे येत्या फेब्रुवारी 2023 पर्यंत पूर्ण करा.

84 कामे जलद गतीने पूर्ण करण्यासाठी जिल्हा परिषदेने एक नोड अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी. हा नोडल अधिकारी प्रत्येक 15 दिवसांनी झालेल्या कामांचा आढावा घेईल. तसेच ज्या कामांमध्ये त्रुटी आहेत त्या कामांच्या त्रुटी पूर्ण करण्यासाठी आठवड्यातील एक दिवस द्यावा व त्याच दिवशी कामाच्या संपूर्ण त्रुटींची पूर्तता करावी. त्याचबरोबर प्रत्येक शाखा अभियंत्यांना पूर्ण करावयाच्या कामांची संख्या ठरवून द्यावी व ती वेळेत पूर्ण करावी, अशा सूचनाही पालकमंत्री  देसाई यांनी केल्या.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कर्जाला कंटाळून यवतमाळच्या शेतक-याची आत्महत्या

News Desk

संजय राऊतांच्या टीकेला चंद्रकांत पाटलांचं प्रत्युत्तर, तर परबदेखील निशाण्यावर!

News Desk

PM, CM, शरद पवारांनाही पत्र लिहिन पण तुम्ही त्यांनी दिलेल्या संधीचा तरी सन्मान करा!

News Desk