मुंबई | शिवसेनेचे प्रवक्ते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीकडून नोटीस अली असून, आता राज्याच्या राजकारणात आता नवीन चळवळींना उधाण आलं आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या 100 कोटी वसुली प्रकरणात परब यांना चौकशीसाठी आज हजर राहायचं आहे. त्याशिवाय परिवहन खात्यातील परब यांच्या मर्जीतील एका अधिकाऱ्याच्या घरावर ईडीने धाडी मारल्या असल्याचे वृत्त आहे. या धाडीत ईडीच्या हाती काय कागदपत्रे लागली याबाबतची माहिती गुलदस्त्यात आहे. त्यानंतर आता अनिल परब यांना आणखी एक धक्का बसला आहे. परिवहन विभागातील पदोन्नतीसाठी लाखो रुपयांची वसुली केल्याची तक्रार भाजप नेते किरीट सोमय्या यांनी राज्यपालांकडे केली होती. त्यानुसार आता राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी लोकायुक्तांना आदेश देऊन या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार 2 सप्टेंबरला या प्रकरणाची सुनावणी होणार आहे.
उद्धव ठाकरे यांचे डर्टी इलेव्हन
किरीट सोमय्या म्हणाले, “ठाकरे सरकारची घोटाळा इलेव्हन. शिवसेना आमदार प्रताप सरनाईकांनी अनधिकृत बांधकाम केलं. माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या वसुली कांडात ईडीने पुरावे दिले. परिवहन मंत्री अनिल परब यांचे रिसॉर्ट, परिवहन विभागात चौकशी, शिवसेना खासदार भावना गवळी यांनी बँकेचे पैसे लाटले, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरांनी गाळे ढापले, माजी मंत्री रवींद्र वायकर आणि रश्मी ठाकरेंनी मिळून जमीन घोटाळा केला. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाडांची एसआरएचा भूखंड प्रकरणी चौकशी सुरु, छगन भुजबळांवर आरोप आहेत. शिवसेना आमदार यामिनी जाधव आणि यशवंत जाधव यांनी UAEमध्ये पैसे पाठवले तर शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी अनधिकृत बंगला बांधला आणि पाडला”.
अनिल परब यांना ईडीची नोटीस
राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीने नोटीस बजावली आहे. याबाबतची माहिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विट करुन दिली आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जनआशीर्वाद यात्रेची नुकतीच सांगता झाली आहे. याआधी राणे यांच्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे राज्यात चांगलेच वादंग माजले होते. या सर्व गोष्टींवर पडदा पडत असतानाच आता परब यांना ईडीने नोटीस दिली आहे.
शिवसेना आणि भाजप यांच्यातील राजकीय संघर्ष टोकाला गेलेला असताना आता ईडीने परिवहनमंत्री अनिल परब यांना नोटीस जारी केली आहे. त्यांना ईडीने येत्या मंगळावरी म्हणजे 31 ऑगस्टला सकाळी 11 वाजता ईडी कार्यालयात हजर राहण्यास सांगितलं आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या 100 कोटी वसुली प्रकरणात परब यांना हे समन्स जारी करण्यात आलं आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.