मुंबई | उत्तराखंडमधील (Uttarakhand) केदारनाथ (Kedarnath) येथे हेलिकॉप्टर कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. हे हेलिकॉप्टर केदारनाथ बेस कॅम्पमधून नारायण कोटी-गुप्तकाशीसाठी उड्डाण केले होते. ही हेलिकॉप्टर दुर्घटना केदारनाथपासून 2 किलोमीटर अंतरावर अपघात झाला आहे. या हेलिकॉप्टरमध्ये 6 जणांचा मृत्यू झाल्याची प्रथामिक माहिती मिळाली आहे.
हे हेलिकॉप्टर खासगी कंपनीचे असल्याची माहिती सांगण्यात येत असून या घटनेची माहिती मिळाताच मदत करणारे पथक घटनास्थळी रवाना झाले आहेत. दुर्घटनाग्रस्त झालेले हेलिकॉप्टर हे आर्यन कंपनीचे होते. या अपघाताच्या वेळी हेलिकॉप्टरमध्ये सहा जण प्रवास करत असल्याची माहिती मिळाली आहे.
#WATCH | Uttarakhand: A helicopter carrying Kedarnath pilgrims from Phata crashes, casualties feared; administration team left for the spot for relief and rescue work. Further details awaited pic.twitter.com/sDf4x1udlJ
— ANI (@ANI) October 18, 2022
केदारनाथमध्ये दाट धुके असल्याने हेलिकॉप्टर कोसळले असावे, असा प्रथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. या अपघातानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ही घटना दुर्दैवी असल्याचे म्हणत मृतांना श्रद्धांजली वाहिली आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.