HW News Marathi
देश / विदेश

केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळल्याची दुर्दैवी घटना; 6 जणांचा मृत्यू

मुंबई | उत्तराखंडमधील (Uttarakhand) केदारनाथ (Kedarnath) येथे हेलिकॉप्टर कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. हे हेलिकॉप्टर केदारनाथ बेस कॅम्पमधून नारायण कोटी-गुप्तकाशीसाठी उड्डाण केले होते. ही हेलिकॉप्टर दुर्घटना केदारनाथपासून 2 किलोमीटर अंतरावर अपघात झाला आहे.  या हेलिकॉप्टरमध्ये 6 जणांचा मृत्यू झाल्याची प्रथामिक माहिती मिळाली आहे.

हे हेलिकॉप्टर खासगी कंपनीचे असल्याची माहिती सांगण्यात येत असून या घटनेची माहिती मिळाताच मदत करणारे पथक घटनास्थळी रवाना झाले आहेत. दुर्घटनाग्रस्त झालेले हेलिकॉप्टर हे आर्यन कंपनीचे होते. या अपघाताच्या वेळी हेलिकॉप्टरमध्ये सहा जण प्रवास करत असल्याची माहिती मिळाली आहे.

केदारनाथमध्ये दाट धुके असल्याने हेलिकॉप्टर कोसळले असावे, असा प्रथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. या अपघातानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ही घटना दुर्दैवी असल्याचे म्हणत मृतांना श्रद्धांजली वाहिली आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

संतापजनक ! संजय राठोडांसोबत चित्रा वाघ यांचे ‘मोर्फ’ केलेले आक्षेपार्ह फोटोज व्हायरल

News Desk

गुजरातमध्ये बिहाऱ्यांना सुरक्षा द्या । नितीश कुमार

News Desk

#Chandrayaan2 : ‘विक्रम लँडर’चे स्थान समजले, ऑर्बिटरने पाठवला फोटो

News Desk