HW News Marathi
क्राइम

संजय राऊतांच्या जामीन अर्जावर 21 ऑक्टोबरला होणार सुनावणी

मुंबई | पत्राचाळ घोटाळ्या प्रकरणी (Patra Chawl land scam case) शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या जामीन अर्जावर 21 ऑक्टोबरला पुढील सुनावणी होणार आहे. यामुळे राऊतांचा तुरुंगातील मुक्काम वाढला आहे. आणखी तीन दिवसांनंतर राऊतांच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. सध्या राऊत ईडीच्या न्यायालयीन कोठडीत आहेत.

यानंतर राऊताना आज (18 ऑक्टोबर) मुंबई सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. या प्रकरणाची सुनावणी 21 ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलली आहे. याआधी न्यायालयाने राऊतांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार होती. परंतु, न्यायालयाने पुन्हा एकदा राऊतांच्या जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलली आहे.

 

ईडीने राऊतांना गोरेगाव येथील पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी त्यांच्या भांडूप येथील निवासस्थानी 31 जुलै रोजी सकाळी ईडीन छापा टाकला. यानंतर राऊतांनी 9 तासांची चौकशी केल्यानंतर ईडी त्यांना ताब्यात केली. यानंतर ईडी कार्यालयात देखील राऊतांची 7 तासांची चौकशी केल्यानंतर ईडीने 31 जुलै रोजी मध्य रात्री अटक केली. यापूर्वी राऊतांना 19 सप्टेंबरला न्यायालयात हजर केले होते. त्यावेळी राऊतांची ईडी कोठडी 4 ऑक्टोबरपर्यंत वाढवली होती. दरम्यान, ईडीने राऊतांविरोधात पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी 16 सप्टेंबर रोजी आरोपपत्र दाखल केले होते. यापूर्वी राऊतांना 5 सप्टेंबर रोजी न्यायालयात हजर केले होते. तेव्हा न्यायालयाने राऊतांना 19 सप्टेंबरपर्यंत सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली होती. यानंतर राऊतांची न्यायालयीन कोठडी आज संपली आहे. याआधी राऊतांना २२ ऑगस्ट रोजी न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यावेळी न्यायालयाने राऊतांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती.

 

नेमके काय आहे प्रकरण

 

मुंबई येथील गोरेगावमध्ये पत्राचाळीत म्हाडाचा भूखंड आहे. यात राऊतांचे निटकवर्तीय प्रवीण राऊत यांची गुरु आशिष कन्स्टरक्शन कंपनीला या चाळचा विकास करण्याचे काम देण्यात आले होते. या चाळीच्या जागेचा काही भाग त्यांनी खासगी बिल्डरला विकल्याचाआरोप राऊतांवर केला आहे. प्रवीण राऊतांनी पत्राचाळीतील लोकांची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. प्रवीण राऊतांनी चाळतील 3 हाजार फ्लॅट बांधकाम सुरू होते. यापैकी 672 फ्लॅट चाळीतील लोकांना द्याचे होते. तर त्या व्यतिरिक्त म्हाडा आणि विकासक यांना वाटून घ्याचे होते. पण 2010 मध्ये प्रवीण राऊतांनी गुरू आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीचे 258 टक्के शेअर एचडीआयएल कंपनीला विकले. यानंतर पत्राचाळी भूखंड 2011, 2012 आणि 2013 अनेक खासगी बिल्डर्सना हस्तांतरित केला.

संबंधित बातम्या

संजय राऊतांनी आईला लिहिले भावनिक पत्र; जाणून घ्या…नेमके काय म्हटले

पत्राचाळ घोटाळा प्रकरणी संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर 17 ऑक्टोबरला होणार सुनावणी

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अपहरण झाल्याचा बनाव, स्वत: अल्पवयीन मुलीने भावाच्या मदतीने रचल्याचे उघड

swarit

त्या शेतकऱ्याच्या मदतीसाठी राष्ट्रवादी-काँग्रेसच्या नेत्यांची मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात धडक

News Desk

“माझे वडील हिंदू आणि आई मुस्लिम, मला माझ्या…,”

News Desk