HW News Marathi
महाराष्ट्र

“दिल्लीत आमचेही दिवस येतील”, संजय राऊतांचा इशारा

मुंबई | शिवसेनेचे आमदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांच्यावर सध्या ईडीचं सावट आहे. त्यामुळे राजकारणात अनेक चळवळींना उधाण आलं आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपा सूडाचं राजकारण करत असून नारायण राणेंच्या अटकेमुळे शिवसेनेला लक्ष्य केलं जात असल्याचा आरोप सध्या होत आहे. याच प्रकरणी आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आपल्या खास शैलीत प्रतिक्रिया नोंदवली आहे.

कर नाही त्याला डर कशाला?

सूडाची भावना आणि बिनबुडाचं राजकारण यातून हे सगळं सुरू आहे. सगळ्यांचे दिवस येतात, दिल्लीत आमचेही दिवस येतील, असा सूचक इशाराही संजय राऊतांनी यावेळी दिला आहे. तसंच कर नाही त्याला डर कशाला? आम्ही काहीही असेल तरी चौकशीला सामोरे जाऊ, असंही ते म्हणाले आहेत. शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत पुढे म्हणाले, ईडी आणि भाजपाची हातमिळवणी आहे. त्यामुळे त्याची आधी चौकशी व्हायला हवी.

ईडीची नोटिस म्हणजे प्रेमपत्र

काही वेळापूर्वीच संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला होता. त्यावेळी ते म्हणाले होते, “ईडीची नोटिस म्हणजे राजकीय नेत्यांसाठी डेथ वॉरंट नसून प्रेमपत्र आहे. महाविकास आघाडी सरकार पाडण्याचे अयशस्वी प्रयत्न केल्यानंतर अशा प्रेमपत्रांची संख्या वाढली आहे. अनिल परबांना भाजपा नेत्यांनी टारगेट केलंय. मात्र, परब नोटिसला उत्तर देतील आणि ईडीला तपासात सहकार्य करतील,” असेही राऊत म्हणाले. तसेच “एकतर भाजपचा माणूस ईडीमध्ये डेस्क ऑफिसर आहे किंवा ईडीचा अधिकारी भाजपच्या कार्यालयात काम करत आहे,” असा टोला राऊतांनी यावेळी लगावला आहे.

शिवसेनेच्या नेत्यांवर काही दिवसांपासून कारवाया सुरूच

यावेळी माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, शिवसेनेच्या नेत्यांवर काही दिवसांपासून कारवाया सुरूच आहेत. आम्हाला ईडीची नोटीस आली तरी आमच्या चेहऱ्यावरचं हास्य ढळणार नाही. शिवसेना हे ईडीचं लक्ष्य आहे. पण त्याचा तसूभरही परिणाम महाविकास आघाडी सरकारवर होणार नाही, त्यांचं मनोधैर्य खचणार नाही. उलट वाढेलच. अनिल परब कायदा क्षेत्रातले जाणकार अल्याने काय करायचं हे त्यांना माहित आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पुण्यात शिवसेना नेते दीपक मारटकरांचा जीवघेण्या हल्ल्यात मृत्यू

News Desk

मशिदीचे भोंगे हटवले नाही, तर लाऊडस्पीकर लावून हनुमान चालीसा लावणार; राज ठाकरेंचा राज्य सरकारला इशारा

Aprna

शिवसेनला धक्का ! तृप्ती सावंत यांचा भाजपमध्ये प्रवेश

News Desk