मुंबई | ” प्रहार हा आंडूपांडूंचा पक्ष नाहीये, असा सूचक इशारा माजी मंत्री आणि आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी आमदार रवी राणा (Ravi Rana) यांना दिला आहे. रवी राणा यांच्यासोबत झालेल्या वादानंतर बच्चू कडू यांनी प्रहार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. यानंतर बच्चू कडू यांनी प्रहार संघटनेच्या मेळाव्यात उपस्थितांना संबोधित केले. यावेळी बच्चू कडू यांनी रवी राणा माफ करत त्यांच्यात झालेल्या वादावर आता पडता पडला आहे.
बच्चू कडू म्हणाले, ‘जली को आग कहते है, बुझी को राख कहते है’ जिस आगसे बारूद निकलती है उसे प्रहार कहैते है. प्रहार हा काही प्रहार हा आंडूपांडूंचा पक्ष नाहीये. एक वार दहा तुकडे करण्याची ताकद आमच्याकडे आहे. आम्ही दिसायला कमी असेल, जो आहे ना तो बाजी आहे. तानाजी आहे, जिथे असेन तिथून वार करण्याची क्षमता आमच्या आहे. मैदाना आले तर मैदानात, सेवेमध्ये आले तर सेवेत, रक्तदानात आले तर रक्तदानामध्ये तलवारीत आले तर तलवारीत सुद्धा आम्ही कमी पडणार नाही. आम्ही कोणाच्या वाटेला जात नाही. गेलो तर कोथळा काढल्याशिवाय राहत नाही. विनाकारण तोंड मारला तर तोंड रंगविल्याशिवाय राहणार नाही. सत्ता गेली चुलीत त्यांची आम्हाला काही परवा नाही. आम्ही ऐवढे ताकदवान आहोत. आम्ही ऐवढे ताकदवान आहोत. गेली 20 वर्ष 350 गुन्हे घेऊन बच्चू कडू फिरतोय. बाकीचे नेते लढ म्हणतात, आणि बच्चू कडू स्वत: लढतोय, हा फरक आहे.”
आपण दोन पावले मागे घेतली तर आम्ही चार पावले मागे घेऊ
रवि राणांनी वादावर दिलगिरी व्यक्त करत माघार घेतल्यावर बच्चू कडू म्हणाले, “काल जो विषय झाला, त्यावर राणा बोलला, खर तर दिलगिरी व्यक्त केली याचा आनंद व्यक्त करतोय. आपण जे काही मोठे पणा घेतला. आणि चूक आपल्या लक्षात आली. त्याची माफी मागितली. याबद्दल पुन्हा आपले आभार मानतो. आपण दोन पावले मागे घेतले. आम्ही चार पावले मागे घेऊ. आम्हाला विनाकारण ऊर्जा खत्म करायची नाही. चांगल्या कामात ऊर्जा लावायची आहे. या सगळ्या आंदोलनात सात दिवसामध्ये आमच्या सुप्रिया ताईने ज्या काही भावना व्यक्त केल्या असेल. आमचे राजू शेट्टीसाहेब असेल आणि गुलाबराव पाटील असेल. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी यशस्वी मध्यस्थी केली. त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. कारण काही वाद न पेटलेले बरे असतात. त्यातून काही आऊट पूट काही निघत नाही. आमचे थोबाड टीव्हीत दिसते हे तुमच्यात काही फरक पडणार नाही. यामुद्द्यावर आपल्याला काम करण्याची गरज नाही. आम्हाला सगळी ताकद ही सामन्या मानसाच्या पाठिशी उभी करायची आहे. तो एकटा पडला नाही पाहिजे.
पहिले वेळ आहे म्हणून माफ
रवि राणा यांच्यात झालेल्या वादासंदर्भात बच्चू कडू म्हणाले, “कोण काय म्हटले हे महत्वाचे आहे, कारण अस्तित्वाचा विजय आहे. कोणीही यावे आणि काही म्हणावे, एवढे काही आम्ही सोपे नाही. ठिक आहे. पहिले वेळ आहे म्हणून माफ आहे. आगे कुठ करेंगा, कोई कुछ करेंगा, मग प्रहारचा वार कसा असेल हे आम्ही तुम्हाला सांगू. आम्ही गांधींना मानतो. भगतसिंग आमच्या ऐवढा डोक्या आहे. मग आमची कधी खटकते माहित नाही पडत. म्हणून त्याचाही विचार झाला पाहिजे.”
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.