मुंबई | “ये दोस्ती आगे चलती रहेगी. संविधान बचाव आणि लोकशाही वाचवण्यासाठी दोन युवा नेत्यांची ही भेट होती”, अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाचे युवासेना प्रमुख आणि आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी बिहारचे उपमुख्यमंत्री आणि राजदचे युवानेते तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) यांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना आदित्य ठाकरे म्हणाले. आदित्य ठाकरे यांनी आज (23 नोव्हेंबर) बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांची भेट घेतली.
आदित्य ठाकरेंनी बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले, “ये दोस्ती आगे चलती रहेगी. संविधान बचाव आणि लोकशाही वाचवण्यासाठी दोन युवा नेत्यांची ही भेट होती असे आदित्य ठाकरे म्हणाले. आदित्य ठाकरे यांनी पुढे बोलताना म्हटले की ही राजकीय भेट नाही, प्रत्येकवेळी राजकीय भेट म्हणून बघू नका. फक्त तेजस्वी यादव यांच्या कामामुळे ही भेट घेतली आहे असेही त्यांनी सांगितले. पर्यावरण, विकासात्मक गोष्टींवर चर्चा, औद्योगिक विकास, देशातील युवकांच्या रोजगाराच्या समस्यांबाबतही चर्चा केली असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले.”
आदित्य ठाकरेंनी तेजस्वी यादव यांना छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती दिली भेट
या भेटीनंतर आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया देताना संविधान आणि लोकशाहीसाठी देशातल्या तरूणांनी संपर्कात राहून, एकत्र येऊन काम करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. तसेच आम्ही आजवर नेहमी संपर्कात राहत होतोच, आता भारतातील युवा म्हणून विविध विषयांवर एकत्र काम करू अशी खात्री आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले. दरम्यान, या भेटीवेळी आदित्य ठाकरे यांनी तेजस्वी यादव यांना छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती तेजस्वी यांना भेट दिली.
आदित्य ठाकरेंनी बिहारच्या मुख्यमंत्र्यांची घेतली सदिच्छा भेट
दरम्यान, आदित्य ठाकरे यांनी पटना येथे बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी सध्याच्या विविध विषयांवर चर्चा झाली. नितीश कुमार वापरत असलेली इलेक्ट्रिक गाडी, पर्यावरण यावरही चर्चा झाली, असं आदित्य ठाकरे यांनी सांगितले. बाळासाहेब आणि उद्धव ठाकरेंशी नितीश कुमार यांचे जुने संबंध आहेत, त्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला, असं आदित्य ठाकरे म्हणाले.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.