HW News Marathi
राजकारण

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीच्या उमेदवार ऋतुजा लटकेंचा राजीनामा नामंजूर; ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ

मुंबई | अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत (Andheri East Assembly By-Election) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून  ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांनी उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. पण,  ऋतुजा लटके यांच्या उमेदवारीमध्ये आता शासकीय नियमामुळे अडचणी निर्माण झालेली आहे.  ऋतुजा लटके या मुंबई महापालिकेच्या कर्मचारी होत्या.  ऋतुजा लटकेंनी महिन्याभरापूर्वीच त्यांच्या शासकीय शासकीय सेवेचा राजीनामा दिला आहे. परंतु,  ऋतुजा लटके यांच्या राजीनामा अद्याप राजीनामा मंजूर करण्यात आलेला नाही. यामुळे  ऋतुजा लटकेंचा राजीनामा मंजूर होत नाही. तोपर्यंत  ऋतुजा लटकेंना अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरता येणार नाही. या शासकीय अडचणीमुळे ठाकरे गटासमोर मोठी अडचण निर्माण झालेली आहे.

शिवसेनेचे अंधेरी पूर्वचे आमदार रमेश लटके यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. लटके कुटुंबियांसोबत दुबईला फिरण्याठी गेले होते. लटके यांना 11 मे रोजी सायंकाळी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. लटके २ वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. लटकेंच्या निधनाने अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाची जागा रिकामी झाल्याने तेथे पोटनिवडणूक लागली. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिंदे गट आणि ठाकरे गटाची ही पहिली निवडणूक असून या निवडणुकीत दोन्ही गटाची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

दरम्यान, ऋतुजा लटकेंचा राजीना महापालिकाने लवकर मंजूर करावा. यासाठी ठाकरे गटाचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर आणि नेते अनिल परब हे दोन्ही नेते पालिका आयुक्त इकबालसिंह चहल आणि सामान्य प्रशासनचे सह आयुक्त मिलिन सावंत यांची भेट घेत आहे.

 

 

Related posts

…तर मोदीजी तुम्हाला जनतेसमोर कान पकडून १०० उठाबशा काढाव्या लागतील !

News Desk

कॉंग्रेसचे सरकार आले तर शेतक-यांना दहा दिवसात मिळेल कर्जमाफी

News Desk

साताऱ्यातील भाजपचा नेता राष्ट्रवादीच्या वाटेवर

News Desk