HW News Marathi
व्हिडीओ

Narayan Rane यांच्या दोन्ही मुलांना मारणार, Beed मधील Shivsainik च्या वक्तव्याने खळबळ

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कानाखाली लगावण्याचं वक्तव्य केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलं त्यानंतर संपूर्ण राज्यभर शिवसैनिक आक्रमक झाले, त्यानंतर नारायण राणे यांना अटक झाली, जामीनही मिळाला, मात्र या सगळ्या नाट्यमय घडामोडींनंतर शिवसैनिक अजूनही आक्रमकच आहेत याचे पडसाद अजूनही महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी दिसतात. आणि त्याबरोबरच भाजप आणि शिवसेना यांच्यात देखील आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरूच आहे. असाच प्रत्यय बीड मध्ये देखील आला.राज्यमंत्री संदीपान भुमरे यांच्या मार्गदर्शनाखाली बीडच्या शासकीय विश्राम गृहात शिवसेनेची बैठक झाली. आणि यावेळी, राज्याचे मंत्री संदीपान भुमरे यांच्यासमोरच शिवसैनिक असलेले गणेश वरेकर यांनी1jचक्क शिवसेनेचे नेते आणि पदाधिकाऱ्यांवर आरोप केला. तर गणेश वरेकर एवढ्यावर न थांबता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बदल कोणी चुकीचे बोलत असेल तर आम्ही सहन करणारे शिवसैनिक नाहीत. त्यामुळे येत्या काळात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या दोन्ही मुलांना मारणार असण्याचा इशारा शिवसेना उपजिल्हाप्रमुख गणेश वरेकर यांनी दिला

#GaneshVarekar #SandipanBhumre #Shivsena #NarayanRane #NiteshRane #NileshRane #BJP #HwnewsMarathi #MarathiVideo #MarathiUpdate #MarathiNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘उद्धव ठाकरेंनी राष्ट्रीय नेता व्हावं पण राष्ट्रवादीपेक्षा मोठं नाही’

News Desk

Gulabrao Patil आणि Sanjay Raut आमने-सामने !

News Desk

Coronavirus In Maharashtra | महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी

swarit